Google ची मोठी कारवाई, डिलीट केले 2200 बनावट Loan Apps; 'असा' करा फ्रॉडपासून बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 11:40 AM2024-02-07T11:40:54+5:302024-02-07T12:04:27+5:30

इंटरनेटवर Loan Apps जाळं खूप जास्त पसरलेलं आहे. असे अनेक बनावट कर्ज देणारे Apps आहेत जे लोकांना फसवून त्यांच्याकडून मोठी रक्कम गोळा करतात.

इंटरनेटवर Loan Apps जाळं खूप जास्त पसरलेलं आहे. असे अनेक बनावट कर्ज देणारे Apps आहेत जे लोकांना फसवून त्यांच्याकडून मोठी रक्कम गोळा करतात. काही प्रकरणांमध्ये, हे बनावट लोन Apps घातक ठरले आहेत.

प्रत्यक्षात कर्जाच्या जाळ्यात अडकून अनेक ग्राहकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा Apps पासून युजर्सचे संरक्षण करण्यासाठी, Google ते वेळोवेळी Play Store वरून काढून टाकत असते.

कंपनीने सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 दरम्यान Google Play Store वरून 2200 बनावट लोन Apps काढून टाकले आहेत. रिपोर्टनुसार, कंपनीने हे पाऊल फेक Apps ला रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांच्या दिशेने उचललं आहे.

संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी या लोन Apps चा सामना करण्यासाठी सरकार RBI सारख्या रेगुलेटरी अथॉरिटीजसोबत कसं काम करत आहे याची माहिती दिली.

आयटी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुगलने एप्रिल 2021 ते जुलै 2022 दरम्यान 3500 ते 4000 Apps चा रिव्यू केला होता. यानंतर कंपनीने प्ले स्टोअरवरून 2500 ॲप काढून टाकले. सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 दरम्यान बनावट कर्ज Apps वर गुगलची कारवाई सुरू राहिली.

या कालावधीत Google ने Play Store वरून 2200 बनावट लोन Apps काढून टाकले आहेत. यासोबतच गुगलने प्ले स्टोअरवरील लोन Apps बाबत आपली पॉलिसी अपडेट केली आहे. आता फक्त त्या लोन Apps ना Google Play Store वर परवानगी दिली जाईल

ऑनलाईन जगात फक्त तुमची सावधगिरीच तुम्हाला सुरक्षित ठेवू शकते. त्यामुळे युजर्सनी कोणतेही App डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची नीट रिसर्च करावा. रिव्यू चेक करण्यासोबतच कंपनीबाबत देखील नीट माहिती घ्या.

App तुमच्याकडून कोणत्या परवानग्या मागत आहे याकडेही लक्ष द्या. नेहमी सुरक्षित पेमेंट चॅनेल वापरा आणि तुमचे सेन्सेटिव्ह डिटेल्स शेअर करणं टाळा.

तुमचे Apps आणि डिव्हाइसेस नेहमी अपडेट ठेवा. कोणतंही App डाउनलोड करण्यासाठी, फक्त Google Play Store किंवा Apple App Store वापरा. हॅकर्सची आपल्या नजर असते त्यामुळे नीट काळजी घ्या.