रिलेशनशिपमध्ये अशाप्रकारचे लोक करतात फसवणूक, रिसर्चमधून खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 01:10 PM2019-02-21T13:10:40+5:302019-02-21T13:17:26+5:30

प्रेमात किंवा नात्यात कुणी दगा दिल्यावर समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होते हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. पण प्रेमात फसवणूक करणारे लोक कसे असतात. हे ओळखणं तसं कठीण काम. मात्र एका ऑनलाइन मार्केट रिसर्चनुसार आणि डेटा अॅनालिटिक्स फर्मनुसार, पाचपैकी एक व्यक्ती फसवणूक करणारी किंवा दगा देणारी असते. काही लोक एकदा दगा देतात, तर काही लोक पुन्हा पुन्हा दगा देतात, पण या दग्यामुळे समोरच्या व्यक्तीवर खोलवर जखम होते. रिसर्चमधून समोर आलं आहे की, काही खासप्रकारचे लोक दगा देण्याची शक्यता अधिक असते. ते कोणते जाणून घेऊ...(Image Credit : theconversation.com)

एकदा फसवणूक करणारा सुधारत नाही - शोधानुसार, एकदा फसवणूक करणारा व्यक्ती पूर्णपणे सुधारू शकत नाही. जे लोक एकदा दगा देतात, त्यांचे दगा देण्याचे आणखी कमीत कमी तीन चान्स असतात. कारण एकदा दगा देणारी व्यक्ती या गोष्टीला जस्टिफाय करणं शिकलेली असते. आणि पुन्हा एकदा तसंच करणं त्याच्यासाठी सोपं आणि सहज झालेलं असतं.

जेनेटिक समस्या - अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, दगा देण्यासाठी जीन्स जबाबदार असतात. या रिसर्चनुसार, दगा देणाऱ्या लोकांमध्ये ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रोसिनचे रिसेप्टर कमी असतात. जे सेक्सनंतर बॉन्डिंगसाठी जबाबदार असतात. यामुळे लोक कोणतीही अटॅचमेंट नसतानाही कुणाशीही शारीरिक संबंध ठेवू शकतात.

वयही जबाबदार - दगा देण्यात व्यक्तीच्या वयाचीही भूमिका असते. ऑनलाइड डेटिंग साइटच्या शोधानुसार, महिलांचं दगा देण्याचं सरासरी वय ३६.६ वर्ष असतं. रिसर्चमध्ये हे सुद्धा सांगण्यात आलं आहे की, ३० वयादरम्यान लोकांमध्ये दगा देण्याची शक्यता अधिक असते.

जास्त पॉर्न बघणारे - सोशल, सायकॉलॉजी अॅन्ड पर्सनॅलिटी सायन्समध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, फार जास्त पॉर्न बघणाऱ्या पुरूषांमध्ये दगा देण्याची शक्यता अधिक असते.

जर एखाद्या व्यक्तीमध्ये भीती असते की, त्याच्या जोडीदाराने दगा देऊ नये, त्यांच्यातही चीट करण्याची शक्यता अधिक असते. यातून हे समोर आलं आहे की, आपल्या पार्टनरकडून फसवणूक होण्याच्या भीतीने त्यांच्यात सूड घेण्याची भावना येते आणि ते सुद्धा फसवणूक करू लागतात.

पॉवरफुल नोकरी असणारे - जर्नल ऑफ सेक्सच्या एका स्टडीनुसार, जे लोक पॉवरफुल नोकरी करत असतात त्यांचीही दगा देण्याची शक्यता अधिक असते. पॉवर असल्याने व्यक्तीमध्ये जास्त आत्मविश्वास येतो आणि त्यामुळे त्यांना वाटत असतं की ते फसवणूक करून त्यातून सहज बाहेर पडतील.