राज्यात ५ हजार ७१७ तृतीयपंथी करणार मतदान; ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 06:41 AM2024-04-26T06:41:45+5:302024-04-26T06:42:05+5:30

राष्ट्रीय मतदारयादीमध्ये तृतीयपंथींचीही स्वतंत्र नोंद असावी, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तृतीयपंथी मतदारांची नोंद होऊ लागली आहे.

Loksabha Election 2024 - 5 thousand 717 transgender will vote in the state; Highest recorded in Thane district | राज्यात ५ हजार ७१७ तृतीयपंथी करणार मतदान; ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक नोंद

राज्यात ५ हजार ७१७ तृतीयपंथी करणार मतदान; ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक नोंद

नारायण जाधव

नवी मुंबई : राज्यात ४ एप्रिल २०२४ पर्यंत ५ हजार ७१७ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली असून, हा आकडा आणखी वाढण्याची  शक्यता आहे. सर्वाधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद ठाणे जिल्ह्यात १ हजार २७९ झाली आहे. ठाण्यापाठोपाठ मुंबई उपनगरमध्ये ८१२ आणि पुण्यात ७२६ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. 

सन २०१९ च्या तुलनेत दुपटीपेक्षाही अधिक तृतीयपंथी मतदारसंख्या वाढल्याने त्या समाजात मतदानाच्या हक्काबाबत सजगता वाढून ते नाव नोंदणीसाठी पुढे येत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय मतदारयादीमध्ये तृतीयपंथींचीही स्वतंत्र नोंद असावी, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तृतीयपंथी मतदारांची नोंद होऊ लागली आहे. २०१४ मध्ये ९१८, तर २०१९ मध्ये हा आकडा दुपटीने वाढून २,०८६ इतका झाला होता. 

समाजाची अवहेलना सोसून रोजगार व शिक्षणाच्या संधी नाकारल्या जाणाऱ्या तृतीयपंथी किंवा भिन्नलिंगी व्यक्तींना ‘तृतीयलिंगी’ असे संबोधले जावे, हा विचार न्यायालयाने प्रभावीपणे मांडल्याने निवडणूक आयोगाकडून मतदारांची नोंदणी करताना स्त्री, पुरुष याप्रमाणे तृतीयपंथी (अदर्स) हा तिसरा रकाना ठेवण्यात येऊ लागला. 

तृतीयपंथींनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी, यासाठी तृतीयपंथी कार्यकर्ते गौरी सावंत, प्रणीत हाटे, झैनाब पटेल हे ‘निवडणूक सदिच्छादूत’ म्हणून काम पाहत आहेत. २०१२ मध्ये मतदारयादीत तृतीयपंथींची संख्या शून्य होती. मात्र, २०१४ पासून त्यांची नोंद हाेऊ लागली.

गोंदिया १०
गडचिरोली ९
हिंगोली ७
भंडारा ५
सिंधुदुर्ग १ 

Web Title: Loksabha Election 2024 - 5 thousand 717 transgender will vote in the state; Highest recorded in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.