श्रीनगरचं तापमानही उणे 4 अंश सेल्सियस, दल लेकवर बर्फाच्या लाद्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 10:30 PM2018-12-31T22:30:48+5:302018-12-31T22:41:40+5:30

दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह जम्मू-काश्मीरमध्ये थंडीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

श्रीनगरचं तापमानही उणे 4 अंश सेल्सियसपर्यंत खाली आलं आहे.

काश्मीरमध्ये तापमान घसरल्यामुळे दल लेक गोठलं आहे.

पर्यटकांचं आवडत ठिकाण असलेल्या दल लेकवर बर्फाच्या लाद्या तयार झाल्या आहेत.

दल लेक गोठल्यामुळे बोटिंग सेवाही बंद करण्यात आली आहे.

बोटींमध्येही पाण्याचा बर्फ झाल्यानं बर्फ फोडून पाणी बाहेर काढावं लागत आहे.

दल लेकवर जमा झालेला बर्फ तोडायलाच फार वेळ लागतो.

दल लेकचा बाहेरचा आणि आतील दोन्ही भाग बर्फाने गोठला आहे.