कुमारस्वामींच्या दुसऱ्या लग्नाची रंजक गोष्ट; बघा कोण आहे 'ती'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 02:05 PM2018-05-21T14:05:13+5:302018-05-21T14:05:13+5:30

पुढच्या दोनच दिवसांत कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांच्या दुसऱ्या लग्नाची रंजक गोष्ट समोर आली आहे. हे लग्न झाल्याची नोंद सरकार दरबारी नसली, तरी कुमारस्वामी आणि अभिनेत्री राधिका यांच्या प्रेमाचे अनेक साक्षीदार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राधिका कुमारस्वामी गुगलच्या टॉप ट्रेंड्समध्ये आहे.

कुमारस्वामी यांनी २००६मध्ये राधिकासोबत लग्न केलं होतं. तब्बल दहा वर्षं कुमारस्वामी दोन्ही घरांना समान वेळ देत होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून ते आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहत असल्याचं निकटवर्तीयांनी सांगितलं.

२०१३मध्ये स्वतःची निर्मिती असलेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी राधिकाने कुमारस्वामींचा फोटो वापरला होता.

कुमारस्वामींचं पहिलं लग्न १९८६ मध्ये झालं होतं. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव अनिता आहे. या लग्नाच्या वेळी राधिकाचा नुकताच जन्म झाला होता.

हिंदू विवाह कायद्यानुसार दोन लग्न करणं गुन्हा आहे. परंतु, कुमारस्वामी-राधिकाच्या लग्नाचा कुठलाही अधिकृत पुरावा नसल्याचं सांगत उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळून लावली होती.

'ही अत्यंत खासगी बाब असून त्यावर मला काहीही बोलायचं नाही. जर काही अडचण असेल तर मी कुटुंबीयांशी चर्चा करून सोडवेन', अशी प्रतिक्रिया देऊन कुमारस्वामींनी या विषयावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

कुमारस्वामी आणि राधिका यांच्या वयात २७ वर्षांचं अंतर आहे. त्या दोघांना शमिका नावाची मुलगीही आहे. मात्र, निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कुमारस्वामींनी आपल्या पहिल्या पत्नीचंच नाव लिहिलं आहे.

२००२ मध्ये राधिकाने कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याच वर्षी तिनं रतन कुमारसोबत पळून जाऊन लग्नही केलं होतं. पण लग्नानंतर काही दिवसांतच रतनचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं होतं. हा राधिकासाठी मोठा धक्का होता. पण नंतर, २०१० मध्ये एका मुलाखतीत आपलं नाव राधिका कुमारस्वामी असं सागून तिनं खळबळ उडवून दिली होती.

२००७ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना कुमारस्वामींनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. ते सुट्टीत राधिकासोबत परदेशी फिरायला गेले होते.

'ही अत्यंत खासगी बाब असून त्यावर मला काहीही बोलायचं नाही. जर काही अडचण असेल तर मी कुटुंबीयांशी चर्चा करून सोडवेन', अशी प्रतिक्रिया देऊन कुमारस्वामींनी या विषयावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे.