प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! आणखी 100 ट्रेन धावण्याची शक्यता, लवकरच मिळू शकतो दिलासा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 11:06 AM2020-09-01T11:06:02+5:302020-09-01T11:17:30+5:30

लॉकडाऊन दरम्यान सध्या काही स्पेशन ट्रेन चालवण्यात येत आहेत. मात्र लवकरच भारतीय रेल्वेकडून आणखी 100 रेल्वे चालवण्यात येण्याची घोषणा होऊ शकते.

देशात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 36 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे.

लॉकडाऊन दरम्यान सध्या काही स्पेशन ट्रेन चालवण्यात येत आहेत. मात्र लवकरच भारतीय रेल्वेकडून आणखी 100 रेल्वे चालवण्यात येण्याची घोषणा होऊ शकते.

येत्या काही दिवसांत येणारे सण लक्षात घेऊन रेल्वेकडूनही नागरिकांच्या सुविधेसाठी ही तयारी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या रेल्वेकडून केवळ 230 एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये 30 राजधानीचा समावेश आहे. या सर्व ट्रेन 'स्पेशल ट्रेन' म्हणून चालवण्यात येत आहेत.

आणखी चालवण्यात येणाऱ्या 100 ट्रेनही स्पेशल पद्धतीने चालवण्यात येतील. या ट्रेन राज्यांतर्गत आणि आंतरराज्यही असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाला यासाठी गृह मंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे.

येत्या दोन महिन्यांत रेल्वेकडून जारी करण्यात येणाऱ्या झिरो-बेस्ड टाईमटेबलमध्ये या ट्रेन्सच्या वेळेमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.

रेल्वे मंत्रालयाने टप्प्याटप्यात परिस्थिती रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं म्हटलं आहे. याआधी प्रवाशांच्या मागणीमुळे ट्रेन चालवण्याचा प्लॅन होता. मात्र कोरोनाची संकट पाहता हे पुढे ढकलण्यात आलं.

केंद्र सरकारने 'अनलॉक 4' अंतर्गत सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मेट्रो रेल्वे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गाचा प्रवास मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची शक्यता आहे.

सणांचेही दिवस आहेत त्यामुळे रेल्वेची मागणी वाढू शकते. तसेच रेल्वे अधिकाऱ्यांकडून जेईई-एनईईटीच्या विद्यार्थ्यांनाही दिलासा देण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगराचे विद्यार्थी केवळ आपलं परीक्षेचं अ‍ॅडमिट कार्ड दाखवून या रेल्वेतून प्रवास करू शकतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.