...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 03:30 PM2024-05-18T15:30:28+5:302024-05-18T15:30:59+5:30

मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

Manoj Jarange Patil warning to the government, again aggressive on Maratha reservation | ...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला

...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला

छत्रपती संभाजीनगर - Manoj Jarange Patil ( Marathi News )  सगेसोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य न झाल्यास मी मैदानात उतरणार, राज्यात सगळ्या जातींना सोबत घेत २८८ जागा लढवणार अशी घोषणाच मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राजकारण माझा मार्ग नाही. मराठा एकत्र आल्याने तुमची लोकसभेला फजिती झाली, हे संकेत आहेत. माझ्या नादी लागू नका. सगेसोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य करा एवढीच माझं म्हणणं आहे. माझा राजकारणाशी काही संबंध नाही. मला माझ्या समाजातील पोरं मोठी करायची आहे. समाजाला ताकद द्यायची आहे. जर तुम्ही हे नाही केले तर २८८ जागांवर मी सर्व जातीचे उमेदवार उतरून गोरगरिबांना निवडून आणणार. सर्व जातीधर्माचे लोक घेणार मग मी मागे हटणार नाही. त्यावेळी नाव घेऊन कुणाला पाडायचे हे सांगेन असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. 

तसेच मुस्लीम, दलित, मराठा यांच्या लेकरांना त्यांचं नुकसान व्हावं असं वाटत नाही. वेगवेगळ्या समुहाचे हाल आहेत. धनगरांना फसवलं, मराठ्यांना फसवलं. आमचे वैर नाही. पण मी कार्यक्रम लावणार, गोरगरिबांना निवडून आणणार. ४-५ जाती एकत्रित आल्या तर १०० टक्के सत्ता आणेन. मग होऊ द्या ७-८ उपमुख्यमंत्री, एक मुस्लीम, एक धनगर, एक दलित, लिंगायत समाज सगळ्यांचा एक एक उपमुख्यमंत्री करू. शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्री झाला तर दणादण शेतकऱ्यांची कामे करतील. मी मैदानात उतरलो, तर गोरगरिबांच्या हाती सत्ता द्या, निवडून येणारे कसे काम करणार नाहीत ते मी बघतो असं आवाहनही जरांगेंनी जनतेला केले. 

दरम्यान, मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही. त्यांच्या व्यासपीठावर बसणारे आज मला फोन करतायेत. समाजाचं काम सोडून मला इतर वेळ नाही. धनंजय मुंडे उपकार ठेवणारे आहेत असं वाटत होते. परंतु गेल्या २-३ दिवसांत मला त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येतायेत. ही परतफेड आहे का, पुढे विधानसभा आहे बघू. तुमच्या नेत्यांना राज्यात फिरायचंय लक्षात ठेवा. मराठा एकजूट आहे. अन्याय सहन करत नाहीत. मराठा आणि वंजारी यांच्यात काही झालं नाही यासाठी सलोख्याची भूमिका बहिण भावाने म्हणायला हवं होते. मराठी वंजारी कुठेच काही झाले नाही. हे दोन्ही एकत्रित राहिले तर त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त होत नाही. निवडणूक गेल्यावर तुम्ही आता गुरगुर करायला लागलाय. जे झालं असेल ते झालं, पुढे एकत्रित राहू असं आवाहन बहिण भावाने करायला हवं होते असा निशाणा जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे-पंकजा मुंडे यांच्यावर साधला. 

Web Title: Manoj Jarange Patil warning to the government, again aggressive on Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.