ती मिटकरी नटूनथटून टिव्हीपुढं बसतंय, शहाजीबापूंच्या टीकेला आमदाराचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 08:00 PM2022-08-31T20:00:17+5:302022-08-31T20:13:23+5:30

राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला जात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत.

राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला जात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत.

शिवसेनेचे काही आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. त्यातून शिंदे गटावर विरोधक सातत्याने टिका करत आहेत.

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा काय झाडी, काय डोंगार, काय हाटील हा डायलॉग तुफान गाजला. त्यामुळे, मुंबईत परत येताच ते महाराष्ट्रभर फेमस झाले. त्यामुळे, त्यांचे विधान सध्या ब्रेकींग न्यूज होत आहे. त्यांनी कोणावरही टिका केली, किंवा टिकेला उत्तर दिले, त्याचीही चर्चा होत आहे.

गणेशोत्सवानिमित्त आज माध्यमांशी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी "मातोश्रीच्या अंगणात सुख भरभरून द्यावं, रश्मी वहिनी आनंदी राहाव्यात" अशी बाप्पाकडे प्रार्थना केली आहे. तसेच, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार प्रहारही केला.

"आज गणरायाचं आगमन झालं, दोन दिवसांत चांगला पाऊस द्यावा. मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती, आनंद भरभरून द्यावा. आमच्या रश्मी वहिनी या आनंदी राहाव्यात अशीच मी गणरायाची चरणी प्रार्थना करतो" असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर देखील जोरदार पलटवार केला. "अमोल मिटकरी हे विचार करण्यासारखं राजकारणातलं पात्र नाही. हे सोंगाड्या आहेत. संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळे मिटकरीला वाटतंय, त्यांची जागा आपल्याला मिळेल म्हणून नटूनथटून तेल लावून टिव्हीपुढे येतंय" असा टोलाही लगावला आहे.

शहाजी पाटलांनी केलेल्या टिकेला आता आमदार मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शहाजी पाटील हे शिंदे गटाचे जॉनी लिव्हर आहेत, अशी बोचणारी टीका त्यांनी शहाजी पाटलांवर केली आहे.

"सध्या सरकारमध्ये शहाजी पाटील हे करमणुकीचं पात्र आहे. शिंदे गटाचे जॉनी लिव्हर, या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही. त्यांच्या मतदारसंघात शून्य विकास आहे. त्यामुळे त्यांनी माझी काळजी न करता शिंदे गटात त्यांची कशी पायखेचनी सुरु आहे, याची काळजी घ्यावी.

शिंदे गटात तुम्ही सध्या कितीही डायलॉगबाजी केली. तरी, तुम्हाला कॅबिनेट तर सोडा साधं राज्यमंत्री हे पदही भेटणार नाहीये. तुमची शेवटीचं टर्म आहे ही", असं अमोल मिटकरी म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरीची गणरायाचं आगमन झालं आहे. या आगमन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकीय चर्चांबद्दल राष्ट्रवादीची भूमिका सांगितली. तसेच, बंडखोर आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचंही ते म्हणाले.