'ओ..श्रीवल्ली'! गौरी कुलकर्णीच्या फोटोवर 'आई कुठे काय करते' फेम अभिची भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 03:59 PM2024-06-18T15:59:11+5:302024-06-18T16:06:02+5:30

Gauri kulkarni: गौरीच्या फोटोवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी.

उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर गौरीने अल्पावधीत प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली.

'आई कुठे काय करते'नंतर गौरी 'प्रेमास रंग यावे' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे. त्यामुळे ती वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते.

अलिकडेच गौरीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

गौरीच्या फोटोवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

गौरीने हिरव्या रंगाच्या साडीत छान नटूनथटून फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोवर अभिनेता निरंजन कुलकर्णी याने कमेंट केली आहे.

'ओ..श्रीवल्ली', अशी कमेंट निरंजनने तिच्या फोटोवर केली आहे. त्यामुळे त्याची कमेंट सध्या चर्चिली जात आहे.

निरंजन आणि गौरी यांनी आई कुठे काय करते या मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.