ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 05:34 PM2024-06-18T17:34:10+5:302024-06-18T17:43:21+5:30

बॉलिवूडची ही अभिनेत्री एका चित्रपटासाठी ३० कोटी रुपये मानधन घेते.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत आलिया भट, कंगना राणौत, प्रियांका चोप्रा, रश्मिका मंदाना, नयनतारा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नावांचा समावेश आहे. २०२४ मध्ये सर्वात महागडी अभिनेत्री बनण्याचा मान बॉलिवूडच्या अभिनेत्रीला मिळाला आहे. तिने कंगना राणौत आणि आलिया भटला मागे टाकले आहे. एका चित्रपटासाठी ती ३० कोटी रुपये मानधन घेते.

बॉलिवूडची ‘ए’ लिस्टर्स अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या ‘द कल्की २८९८’ या आगामी बिगबजेट चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘मॉम टू बी’ दीपिका सप्टेंबरमध्ये तिच्या बाळाला जन्म देणार आहे.

तिच्या चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी असून ती म्हणजे आज आयएमडीबी (इंटरनेट मुव्ही डाटाबेस)ने २०२४ या वर्षातील महागड्या अभिनेत्रींची यादी जाहीर केली. त्यात कंगना आणि प्रियांकाला मागे टाकत दीपिका पादुकोण ही सर्वांत महागडी अभिनेत्री बनली आहे.

जाहीर झालेल्या यादीनुसार, दीपिका प्रत्येक चित्रपटासाठी १५ ते ३० कोटी रूपये एवढी फी आकारते.

त्यानंतर कंगना राणौत हिचे नाव असून तिने आगामी ‘इमरजन्सी’ चित्रपटासाठी १५ ते २७ कोटी रूपये एवढी फी आकारली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा असून ती १५ ते २५ कोटी रूपये एवढे मानधन स्विकारते.

चौथ्या क्रमांकावर कतरिना कैफ हिचे नाव असून ती १५ ते २५ कोटी एवढे मानधन घेते.

तसेच आलिया भट ही पाचव्या क्रमांकावर असून ती १० ते २० कोटी रूपये एवढे मानधन घेत असल्याचे स्पष्ट होते. या यादीत कुठल्याही साऊथच्या अभिनेत्रीचे नाव नाही.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा या दोघींचे नाव सर्वांत खाली असून अनुष्का ८ ते १२ कोटी एवढे तर ऐश्वर्या १० कोटी रूपये एवढी फी घेते.