'हसीन दिलरुबा' तापसी पन्नूचं लाल साडीत बोल्ड फोटोशूट, फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 05:23 PM2024-06-18T17:23:02+5:302024-06-18T17:34:19+5:30

अभिनेत्री तापसी पन्नू हिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर एक चाहता वर्ग निर्माण केलाय.

तापसीला साड्यांची विशेष आवड आहे. वेगवेगळ्या साड्यांमधले फोटो ती कायमच शेअर करत असते.

नुकतंच तिने लाल रंगाच्या साडीत बोल्ड फोटोशूट केलंय, ज्याचे फोटो व्हायरल होतायत.

लाल रंगाच्या साडीवर तापसीने लाल रंगाचा डिझायनर ऑफ-शोल्डर ब्लाऊज परिधान केला आहे.

मोकळ्या केसांची स्टाईल करत तापसीने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

या फोटोशूटमध्ये ती अत्यंत बोल्ड दिसत आहे. चाहत्यांची तिच्या या फोटोंवरुन नजरच हटत नाहीये.

तापसीच्या 'हसीन दिलरुबा' या सिनेमात जसा तिचा लूक होता, अगदी तसाच लूक तिने केलाय.

'हसीन दिलरुबा' चित्रपटाच्या यशानंतर आता चित्रपटाचा दुसरा भागही रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

'हसीन दिलरुबा' चित्रपटात तापसी पन्नू, विक्रांत मेसी, हर्षवर्धन राणे अशा अनेक कलाकारांचा समावेश होता. ही रोमँटिक-थ्रिलर फ्रँचायझी पुन्हा एकदा नव्या रुपात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

यावेळी एक नवीन पात्र सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये लोकप्रिय अभिनेता सनी कौशल आहे. तसेच जिमी शेरगिल हा पोलिस अधिकाऱ्याची भूमिकेत पाहायला