खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर कोसळली दरड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 11:34 AM2017-08-21T11:34:12+5:302017-08-21T11:51:09+5:30

खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर कोसळली भलीमोठी दरड, सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सोमवारी (21 ऑगस्ट) पहाटे 5.30-6 वाजण्याच्या सुमारास मंकी हिलजवळ ही दरड कोसळली.

दरड कोसळून झालेल्या अपघातात 3 प्रवासी जखमी झाले आहेत

जखमी प्रवाशांवर कर्जत येथील रेल्वे प्रशासनाच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले

दरड कोसळल्याने हुबळी एक्स्प्रेसच्या बोगीचंही प्रचंड नुकसान झाले आहे

जुलै महिन्यातही मंकी हिलजवळच रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली होती. दरड पडल्याचे लक्षात येताच सिंहगड एक्स्प्रेसच्या चालकानं प्रसंगावधान दाखवत तात्काळ गाडी थांबवली होती.

18 जुलै 2017 : खंडाळा घाटातच मंकी हिलजवळ मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरुन घसरले होते

टॅग्स :अपघातAccident