बर्फात अडकलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवण्यासाठी जवानांनी लढवली ‘अशी’ युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:28 PM2017-12-11T12:28:02+5:302017-12-11T12:49:09+5:30

लंडनमध्ये बर्फाच्या नदीत अडकलेल्या एका कुत्र्याला अग्निशामक दलातील जवांनानी शर्थीचे प्रयत्न करून वाचवलं

नदीवर तयार झालेल्या बर्फात हा कुत्रा अडकला होता. जवानांनी त्या कुत्र्याला शक्कल लढवत वाचवले. जवानाच्या या कामगिरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

बर्फामध्ये कुत्र्याचा पाय अकला होता, त्याला हलताही येत नव्हते. हा प्रकार जेव्हा कुत्र्याच्या मालकाला दिसला तेव्हा त्यांनी त्वरीत अग्निशमक दलाला पाचारण केलं.

नदीच्या मधोमध अडकलेल्या कुत्र्याला वाचवणं फार कठीण होतं. त्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनची गरज होती. युक्ती लढवत या जवानांनी एका जवानाला रश्शीने बांधून घेतलं.

रश्शीने बांधून घेतलेला जवान बर्फाच्या नदीवरून आडवा होत पुढे गेला. थोडं अंतरावर गेल्यावर त्याने कुत्र्याला पकडलं देखील. मात्र कुत्र्याला पकडल्यावर तो कुत्रा आणखी बर्फात रुतत गेला.

रुतलेल्या कुत्र्याला काढण्यासाठी प्रयत्न करणारा जवानही खाली रुतला गेला. मात्र अग्निशामक दलातील जवानाने त्या दोघाना खेचून बाहेर काढलं.