बार्सिलोनाचे 'सुपर' डुपर जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 03:48 PM2018-08-13T15:48:18+5:302018-08-13T15:51:34+5:30

कर्णधारपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर लिओनेल मेस्सीने पहिल्याच स्पर्धेच जेतेपदाचा चषक उंचावला. बार्सिलोना क्लबने सोमवारी सेव्हियावर 2-1 असा विजय मिळवून स्पॅनिश सुपर कप जिंकला.

बार्सिलोनाचा गोलरक्षक मार्क-आंद्रे स्टीगन याने सेव्हिया क्लबच्या विस्सॅम बेन येड्डेरचा गोल करण्याचा प्रयत्न अडवला.

औस्मान डेम्बेलेने 78 व्या मिनिटाला केलेला गोल बार्सिलोनाच्या विजयात निर्णायक ठरला.

सेव्हियाच्या पॅब्लो सॅरेबियाने 9 व्या मिनिटाला गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती.

पहिल्या सत्रात गेरार्ड पिक्यूने (42 मि.) बार्सिलोनासाठी बरोबरीचा गोल केला.