मुलगा परीक्षा द्यायला गेला; घरी परतला तेव्हा आई वडिलांचा मृतदेह पाहून बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 01:43 PM2022-02-24T13:43:55+5:302022-02-24T14:38:38+5:30

Crime Case : ११ वर्षाचा मुलगा परीक्षेसाठी शाळेत गेलेला. परीक्षा संपल्यानंतर घरी येऊन पाहतो तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि जोरदार धक्का त्याला बसला.

हरियाणातील फरिदाबादमध्ये महिला हेड कॉन्स्टेबल आणि तिच्या पतीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोघेही सेक्टर-३१ येथील पोलीस लाईनमध्ये मृतावस्थेत आढळले.

दोघेही सेक्टर-३१ येथील पोलीस लाईनमध्ये मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हेडकॉन्स्टेबल सरोज या गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस लाइन्स येथील राहत्या घरी कुटुंबासह राहत होत्या. हेड कॉन्स्टेबल म्हणून त्या एनआयटी पोलिस ठाण्यात तैनात होत्या.

बलवंत सिंग (SHO सेक्टर-31) यांनी सांगितले की, पोलीस लाईनमध्ये राहणारी महिला हेड कॉन्स्टेबल सरोज यांची हत्या केलेल्या अवस्थेत आणि तिच्या पतीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

पोलीस प्रकरणाच्या तपासात गुंतले असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर हत्येमागची कारणे समोर येतील.पोलीस लाईनमध्ये राहणारी महिला हेड कॉन्स्टेबल सरोजची हत्या करण्यात आली आहे.

महिला हेड कॉन्स्टेबलच्या नातेवाइकांच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, ज्यांच्याविरोधात पोलिसात तक्रारही दिली जाईल, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

सरोज यांना 11 वर्षांचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. सरोजचा खून झाला त्या दिवशी तो परीक्षा देण्यासाठी गेला होता. परत आल्यावर मुलाला कळले की त्याचे आई-वडील या जगात नाहीत.