NPS पासून डेबिट कार्डपर्यंत, १ एप्रिलपासून बदलणार हे ५ नियम, सर्वसामान्यांवर असा होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 06:55 PM2024-03-29T18:55:21+5:302024-03-29T19:02:09+5:30

Rule Change From 1st April: मार्च महिना आता दोन दिवसांत संपणार आहे. सोबतच २०२३-२४ हे आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. तर १ एप्रिलपासून २०२४-२५ या नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. १ एप्रिलपासून पैशांशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहे. त्याचा थेट परिणाम हा तुमच्या खिशावर पडणार आहे. १ एप्रिलपासून कोणकोणते नियमा बदलणार आहेत त्यांची माहिती पुढील प्रमाणे.

मार्च महिना आता दोन दिवसांत संपणार आहे. सोबतच २०२३-२४ हे आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. तर १ एप्रिलपासून २०२४-२५ या नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. १ एप्रिलपासून पैशांशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहे. त्याचा थेट परिणाम हा तुमच्या खिशावर पडणार आहे. १ एप्रिलपासून कोणकोणते नियमा बदलणार आहेत त्यांची माहिती पुढील प्रमाणे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का दिला आहे. एसबीआयच्या काही डेबिट कार्डचा वार्षिक मेन्टेनन्स चार्ज वाढवण्यात आला आहे. हे नवे दर १ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहेत. बँकेने आपल्या बहुतांश डेबिट कार्डवरील मेन्टेनन्स चार्ज वाढवला आहे. बँकेच्या कार्डचा चार्ज हा प्रत्येक कार्डच्या आधारावर वेगवेगळा असतो.

PFRDA ने एनपीएसमध्ये आधार बेस्ड लॉगइन ऑथेंटिकेशन सुरू करण्याच्या तयारीत आहे. हा नियम १ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहे.

सरकारकडून दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजीचे दर निश्चित केले जातात. सरकारी तेल कंपन्या घरगुती वापराच्या एलपीजीसह व्यावसायिक सिलेंडरच्या दरातही बदल करू शकतात. मात्र सध्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याने सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यका फार कमी आहे.

ओला मनीने त्यांच्या ग्राहकांना १ एप्रिलपासून कंपनी फूल नो युअर कस्टमर वॉलेट (KYC) वरून स्मॉल प्रिपेड इंस्ट्रूमेंट (PPI) वॉलेटमध्ये शिफ्ट होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना केवायसी प्रोसेसमध्ये लागणारा वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. कंपनीने सांगितले की, आम्ही १ एप्रिलपासून १० हजारच्या मॅक्सिमम वॉलेट लोड मर्यादेसाठी स्मॉल पीपीआय सिस्टिममध्ये शिफ्ट करत आहोत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल महिन्यात बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये ईद, रामनवमी इत्यादी सणांसाठी बँका बंद राहणार आहेत. एप्रिल महिन्यात देशातील विविध भागातील बँका १४ दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याची सविस्तर यादी देण्यात आलेली आहे.