मकरसंक्रांतीला ४ योग: ५ राशींची संक्रांत टळेल, सुख-समृद्धी मिळेल; उत्पन्न वाढेल, शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 07:07 AM2024-01-15T07:07:07+5:302024-01-15T07:07:07+5:30

मकरसंक्रांतीला काही राशींना शुभ योगांचा उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

मकरसंक्रांती हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत. या दिवसापासून सूर्य मकर राशीत भ्रमण करू लागतो. हा सण माघ शुद्ध सप्तमीपर्यंत साजरा केला जातो. महाराष्ट्रात सवाष्णी सुघड पुजून वेगवेगळी वाणे एकमेकींना देतात. तीळगूळ, तिळाचा हलवा, तिळाच्या वड्या एकमेकांना देऊन ‘तीळगूळ घ्या गोड बोला’, असा स्नेहाचा संदेश दिला जातो.

सूर्य आणि गुरु एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या घरात उपस्थित राहणार आहेत. ज्यामुळे सूर्य आणि गुरुचा चतुर्थ दशम योग तयार होत आहे. या दिवशी चतुर्थ दशम योगासह रवियोग, वरियान योग आणि शततारका नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने मकरसंक्रांतीचे महत्त्व अधिक आहे. १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांत आहे. मकरसंक्रांतीचा पुण्यकाल सकाळी ०७ वाजून १० मिनिटे ते सायंकाळी ०६ वाजून २० मिनिटे आहे.

मकरसंक्रांतीच्या दिवशी शुभ योग तयार होत असल्याने ५ राशींना फायदा होणार आहे. यासह काही ज्योतिषीय उपाय सांगितले जात आहेत. मकरसंक्रांतीच्या काळात चंद्र कुंभ राशीत असेल. या उपायांचे पालन केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होईल. मकरसंक्रांतीला महादेवाची कृपा प्राप्त होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना मकरसंक्रांती शुभ आणि फलदायी असणार आहे. नफा मिळविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांमध्ये चांगले यश मिळेल. करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होईल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबतच्या काही वादाचे निराकरण होऊ शकेल. कोणतेही काम कराल, त्याचे चांगले फळ मिळेल. सन्मानही वाढेल. आईसोबतचे नाते चांगले राहील. प्रत्येक पावलावर साथ मिळेल. शक्य असल्यास शिवचालीस पठण किंवा श्रवण करावे.

कन्या राशीच्या व्यक्तींना मकरसंक्रांती फायदेशीर ठरू शकेल. खाण्याच्या सवयींकडेही विशेष लक्ष द्या. नवीन नोकरीसाठी तयारी करत आहेत, त्यांना एखाद्या मित्राच्या मदतीने चांगली ऑफर मिळू शकते. जी करिअरसाठी उत्तम ठरेल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. एखाद्या धार्मिक स्थळालाही भेट देऊ शकता. शक्य असल्यास विशेष व्रताचे आचरण करून शंकरावर अभिषेक करावा. मध, तूप, दूध, काळे तीळ या पैकी वस्तू अर्पण कराव्यात.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीतील लोकांना अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. काम वेळेवर पूर्ण करू शकाल. सर्वांशी चांगले संबंध ठेवतील. व्यापारी आणि व्यावसायिकांबद्दल बोलायचे तर, चांगला नफा मिळू शकेल. चांगली प्रतिष्ठा वाढेल. इतर काही नवीन व्यवसायातही गुंतवणूक करू शकता. कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. शक्य असल्यास शिवरक्षाकवच मंत्रांचा यथाशक्ती जप करावा.

मकर राशीच्या व्यक्तींवर महादेवाची कृपा राहील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. करिअरला गती मिळेल. स्वतःचा व्यवसाय करत असाल तर तो पुढे नेण्यास सक्षम असाल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांचा भागीदारांशी चांगला समन्वय असेल. नफा मिळविण्याच्या शुभ संधी मिळतील. अध्यात्मिक कार्यांकडे अधिक कल असेल. शक्य असल्यास शिवलिंगावर पाच बेलपत्र अर्पण करावीत. शिवाष्टकाचे पठण किंवा श्रवण करावे.

मीन राशीच्या व्यक्तींना मकरसंक्रांती लाभदायक ठरू शकेल. गुंतवणुकीचा विचार करत असतील किंवा जमीन आणि वाहने खरेदी करायची असतील तर इच्छा पूर्ण होऊ शकेल. महादेवाच्या कृपेने अचानक परिस्थिती अनुकूल होऊ लागेल. काही व्यावसायिक सौदे व्यापाऱ्यांना मोठा नफा देतील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. मित्र आणि हितचिंतकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मनाला शांतता मिळेल. जोडीदारासोबत काही मतभेद झाले असतील तर ते संपुष्टात येतील.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.