शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांच्या कोट्यासाठी ‘झेडपी’ अध्यक्षांची लॉबिंग

By admin | Updated: May 24, 2014 23:56 IST

जिल्हा परिषद अध्यक्षांकडील २0 बदल्यांचा कोटा कायम ठेवावा यासाठी यवतमाळातून लॉबिंग केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील जिल्हा परिषद अध्यक्षांनी मुंबईवारी केली आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्षांकडील २0 बदल्यांचा कोटा कायम ठेवावा यासाठी यवतमाळातून लॉबिंग केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील जिल्हा परिषद अध्यक्षांनी मुंबईवारी केली आहे.

गेल्या वर्षी जिल्हा परिषद अध्यक्षांना २0 बदल्यांचा कोटा दिला गेला होता. या बदल्या त्यांनी एकत्र किंवा वर्षभरात टप्प्याटप्प्याने करायच्या होत्या. या कोट्याआड जणू आर्थिक उलाढालीची मूभा दिली गेली होती. परंतु यावर्षी धडकलेल्या बदल्यांच्या नव्या आदेशात हा कोटा गोठविण्यात आला आहे. त्यामुळे यवतमाळसह राज्यभरातील जिल्हा परिषद अध्यक्ष अस्वस्थ झाले आहे. हा कोटा परत मिळावा म्हणून येथील जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी लॉबिंग केले. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदांसह काँग्रेसमधील

आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेतील ५00 ते ७00 बदल्यांना स्थगनादेश मिळाला आहे. शिक्षकांच्या बदल्या मात्र चांगल्याच लांबणीवर पडण्याची चिन्हे आहे. कारण आधी आरटीईनुसार पदनिर्धारण व त्यानंतर समायोजन करण्याचे निेर्देश आहे. त्यानंतर कुठे शिक्षकांच्या बदल्या होणार आहे. पदनिर्धारणाबाबत शासन सूचना तथा आकृतीबंध देणार आहे. त्याची प्रतीक्षा आहे. आता आचारसंहिता लागल्याने या बदल्या ऑगस्टपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.

(जिल्हा प्रतिनिधी)

‘कनेक्टेड’ अध्यक्षांना देशमुखांनी स्वत: संपर्क केल्याची माहिती आहे. सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी एकवटण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर अध्यक्षांनी मुंबईवारीही केली. आत्ताच लोकसभेची आचारसंहिता संपली. पुन्हा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कामकाज कसे खोळंबले याची माहिती देशमुख यांनी मुंबईत पक्षाच्या नेत्यांना दिली. कोटा कायम ठेवण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्यातच जिल्हा परिषदेचे प्रशासन बोलताना गोड पण कागदावर काटेकोर वागत असल्याने राष्ट्रवादीची येथे अडचण होत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या गोड बोलण्यामुळे पदाधिकार्‍यांचा अन्य विभाग प्रमुखांवर दबाव वाढत असल्याचा सूर आहे.