चक्क आमदाराच्या गाडीपुढे झोपला युवक, घरासमोर रस्ता नसल्याने घेतला पवित्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 10:20 AM2021-03-20T10:20:11+5:302021-03-20T10:28:48+5:30

Yawatmal News Wardha शिवसेना नेते माजी वनमंत्री आमदार संजय राठोड हे नियमितपणे जनता दरबाराकरिता आपल्या मतदार संघातील  दिग्रस (जि. यवतमाळ) येथे जात असतात. पण एका अपंग युवकाची संजय राठोड यांची भेट शक्य झाली नाही .

The youth slept in front of the MLA's car and took Pavitra as there was no road in front of his house | चक्क आमदाराच्या गाडीपुढे झोपला युवक, घरासमोर रस्ता नसल्याने घेतला पवित्रा 

चक्क आमदाराच्या गाडीपुढे झोपला युवक, घरासमोर रस्ता नसल्याने घेतला पवित्रा 

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : शिवसेना नेते माजी वनमंत्री आमदार संजय राठोड हे नियमितपणे जनता दरबाराकरिता आपल्या मतदार संघातील  दिग्रस (जि. यवतमाळ) येथे जात असतात. पण एका अपंग युवकाची संजय राठोड यांची भेट शक्य झाली नाही . व्यथित झालेल्या या अपंग युवकाने शुक्रवारी दुपारी दिग्रस येथे आमदार संजय राठोड यांची गाडी येत असताना चक्क रस्त्यावर झोपून त्यांचा रस्ता अडविला. यामुळे एकच गोंधळ उडाला.  

अपंग भास्कर वाघमारे गाडीपुढे झोपताच तेथे बघ्यांची गर्दी झाली. त्यानंतर पोलिसांनी वाघमारे यास उठवून आमदार राठोड यांचेकडे घेऊन गेले. यावेळी भास्कर वाघमारे याने एकवेळ आपल्या  वार्डात  भेट देऊन नगरसेवकांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी केली. यावेळी आमदार राठोड यांनी थोड्या वेळात येतो असा शब्द दिला. मात्र नंतर ते शहरातील लोकार्पण सोहळ्यास निघून गेले.

Web Title: The youth slept in front of the MLA's car and took Pavitra as there was no road in front of his house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.