शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्यांच्या बेदम मारहाणीत मारेगावातील युवकाचा मृत्यू़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 05:00 IST

शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील लालसरे व वाढई या कुटुंबात ९ ऑक्टोबर रोजी वाद झाला. त्यानंतर पुन्हा ११ ऑक्टोबर रोजी या दोन कुटुंबात वादावादी होऊन हाणामारी झाली. मारहाणीत संजय वाढईच्या पोटातील आतडी फाटल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला प्रथम मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नंतर त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस उपचार केल्यानंतर १३ ऑक्टोबरला उपचारादरम्यान संजयचा मृत्यू झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या बेदम मारहाणीत येथील एका युवकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त मृताच्या नातलगांनी मारेगाव पोलीस ठाण्यात जाऊन मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करा, अशी मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात एका महिलेसह तिघांना बेड्या ठोकल्या. यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात येणार आहे. आरोपींमध्ये दोन मुले व त्यांच्या आईचा समावेश आहे. संजय लक्ष्मण वाढई (२७) असे मृताचे नाव आहे. शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील लालसरे व वाढई या कुटुंबात ९ ऑक्टोबर रोजी वाद झाला. त्यानंतर पुन्हा ११ ऑक्टोबर रोजी या दोन कुटुंबात वादावादी होऊन हाणामारी झाली. मारहाणीत संजय वाढईच्या पोटातील आतडी फाटल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला प्रथम मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नंतर त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस उपचार केल्यानंतर १३ ऑक्टोबरला उपचारादरम्यान संजयचा मृत्यू झाला.  या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला हर्षल धनराज लालसरे (२३) याच्यासह एका अल्पवयीन आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. दरम्यान, शवविच्छदेनानंतर  गुरुवारी संजयचा मृतदेह मारेगावात आणण्यात आला. त्यानंतर मृताच्या काही नातलगांनी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणात आणखी काही आरोपी असून सर्वाना अटक करा, अशी मागणी केली. पोलिसांनी चौकशी करून रेखा धनराज लालसरे (४५) या महिलेलाही खुनाच्या गुन्ह्यात अटक केली.  या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून सर्व आरोपीवर कडक कारवाई करू, असे पोलिसांनी सांगितले.

मृत संजय आणि आरोपी हर्षल होते जिवलग मित्र - या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल धनराज लालसरे व मृत संजय लक्ष्मण वाढई हे दोघेही शेजारी असून जिवलग मित्र होते. गेल्या अनेक वर्षांपासून दोघेही मंडप डेकोरेशनचे काम एकत्र करायचे. परंतु काही दिवसांपासून दोघांत क्षुल्लक कारणावरून मतभेद झाले.  दोघांत वारंवार खटके उडत असत.  ११ ऑक्टोबर रोजी दोघांत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संजयचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात येऊन रेखा धनराज लालसरे (४५) ही महिलाही या प्रकरणात सहभाग असून तिलाही अटक करा, अशी मागणी केली.  चौकशीअंती या प्रकरणात रेखासह एकूण तीन जणांविरूद्ध भादंवी ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. - संजय पुज्जलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस