लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील चातारी येथे उसणे दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून २३ वर्षीॅय युवकाचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी सायंकाळी उशिरा बसस्थानक परिसरात घडली.योगेश शिवाजी कुंबलवाड (२३) असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी चातारी येथील बसस्थानक परिसरात योगेश हा आरोपी राजू उर्फ मारोती साहेबराव भोयर (२३) याला पैसे मागण्यासाठी गेला होता. दोघांमध्ये प्रथम बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. हाणामारीत आरोपी राजूने योगेशचा गळा दाबला तसेच नाकावर बुक्कीचा ठोसा लगावला. यामुळे योगेश जमिनीवर कोसळला. या दरम्यान संतोष पवार व निखिल कुंबलवाड हे दोघे घटनास्थळी पोहोचले. मात्र तत्पूर्वीच आरोपी राजूने योगेशला दुचाकीवर बसवून रुग्णालयात नेण्याचे नाटक केले.दरम्यान योगेशला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत योगेशचे काका गणपत कुंबलवाड यांनी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपी राजू भोयर याला अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, ठाणेदार अनिल किनगे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय महेश घुगे, कॉन्स्टेबल हेमंत बंडकर पुढील तपास करीत आहे.
चातारी येथे उसणवारीवरून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST
योगेश शिवाजी कुंबलवाड (२३) असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी चातारी येथील बसस्थानक परिसरात योगेश हा आरोपी राजू उर्फ मारोती साहेबराव भोयर (२३) याला पैसे मागण्यासाठी गेला होता. दोघांमध्ये प्रथम बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. हाणामारीत आरोपी राजूने योगेशचा गळा दाबला तसेच नाकावर बुक्कीचा ठोसा लगावला.
चातारी येथे उसणवारीवरून युवकाचा खून
ठळक मुद्देउमरखेड पोलिसांनी केले आरोपीला अटक : शाब्दीक वादाचे रुपांतर झाले हाणामारीत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}