शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या वैज्ञानिकाचे नाव दिले लघुग्रहाला

By admin | Updated: July 22, 2014 00:05 IST

अनंत ब्रम्हांडातील एका लघुग्रहाचा शोध यवतमाळचे वैज्ञानिक डॉ. आशिष महाबळ यांनी लावला. साडेचार अब्ज वर्षापूर्वीचा फेथेन हा लघुग्रह शोधून काढला. दीर्घ अभ्यासानंतर त्याची अवकाशातील

फेथन लघुग्रह : दीर्घ अभ्यासानंतर यशयवतमाळ : अनंत ब्रम्हांडातील एका लघुग्रहाचा शोध यवतमाळचे वैज्ञानिक डॉ. आशिष महाबळ यांनी लावला. साडेचार अब्ज वर्षापूर्वीचा फेथेन हा लघुग्रह शोधून काढला. दीर्घ अभ्यासानंतर त्याची अवकाशातील कक्षा निश्चित केली. त्यांचे संशोधन कायमस्वरुपी आठवणीत राहावे म्हणून आता या लघुग्रहाला महाबळांचे नाव देण्यात आले. वैज्ञानिक क्षेत्रातली ही फार मोठी उपलब्धी असून यवतमाळच्या वैभवात मानाचा तुरा खोवला गेला.डॉ. आशिष अरविंद महाबळ मुळ यवतमाळचे. १९७९ मध्ये अमेरिकेची स्कायलॅब पृथ्वीवर कोसळली. तेव्हापासून आशिषला अवकाश संशोधनाची प्रचंड जिज्ञासा निर्माण झाली. मुलाची अवकाशा विषयी जिज्ञासापाहून कुटुंबीयांनी त्यांना टेलीस्कोप दिला. शिक्षणा दरम्यान डॉ. जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनात त्यांनी अ‍ॅस्ट्रोफिजीक्समध्ये पीएचडी केली. १९९९ ला ते अमेरिकेत गेले. या ठिकाणी त्यांनी नासामध्ये अंतराळातील लघुग्रहाचा शोध घेतला. या शोधादरम्यान त्यांना साडेचार अब्ज वर्षापूर्वी जेव्हा सूर्यमाला घडत होती. तेव्हा मंगळ आणि गुरू ग्रहाच्या दरम्यान एक फेथन नावाचा ग्रह उदयास येत होता. मात्र गुरू आणि सुर्याच्या ओढातानीत या ग्रहाचे असंख्य तुकडे झाले. त्याच अवस्थेत ते आजतागायत सुर्याभोवती फिरत आहेत. या ठिकाणी फिरत असलेला लघुग्रह त्यांनी शोधुन काढला. अमेरिकेतील पॅसेडेना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॅटलीना रियल टाईम ट्रान्झीयंट सर्वे या प्रकल्पाअंतर्गत कॅटलीना स्काय सर्व्हेचा डाटा वापरला जातो. डॉ. आशिष महाबळ हे या संस्थेचे सदस्य आहे. या सदस्यांनी रेडिओ टेलिस्कोपच्या माध्यमातुन हा लघुग्रह शोधून काढला होता. पुढे त्याचा आकार व कक्ष ठरविण्यात डॉ. महाबळ यांना यश आले. त्यांच्या या योगदानाबद्दल मायनर प्लॅनेट संस्थेने या लघुग्रहाला महाबळाचे नाव दिले. हा ग्रह सूर्याच्या बाजूला ३० अंशावर आहे. (शहर वार्ताहर)