यवतमाळकरांनो, किराणा घेताय की कोरोना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:01:09+5:30

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन घोषित केले. तत्पूर्वी शुक्रवारी नागरिकांना खरेदीसाठी सायंकाळी ५ वाजतापर्यंत वेळ दिली होती. यामुळे शुक्रवारी शहराच्या बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी एकच गर्दी उसळली होती.

Yavatmalkars, do you buy groceries or Corona? | यवतमाळकरांनो, किराणा घेताय की कोरोना ?

यवतमाळकरांनो, किराणा घेताय की कोरोना ?

ठळक मुद्देखरेदीसाठी उसळली गर्दी : सण-उत्सवाची पार्श्वभूमी, लॉकडाऊनच्या घोषणेमुळे घाई, पुढील आठ दिवस शहरात संचारबंदीसणांसाठी किराणा, कापड खरेदी, गर्दीमुळे संसर्गाचा धोका वाढला

रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांनी २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढील सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे शुक्रवारी यवतमाळच्या बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी उसळली होती. या गर्दीने नागरिक किराणा घेत आहेत की कोरोना, असा प्रश्न निर्माण झाला होता.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन घोषित केले. तत्पूर्वी शुक्रवारी नागरिकांना खरेदीसाठी सायंकाळी ५ वाजतापर्यंत वेळ दिली होती. यामुळे शुक्रवारी शहराच्या बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी एकच गर्दी उसळली होती.
दत्त चौक, नेताजी चौक, मेनलाईन, आझाद मैदान, स्टेट बँक रोड, तहसील चौक, आठवडीबाजार परिसर आदी ठिकाणी ग्राहकांनी विविध दुकानात एकच गर्दी केली होती. ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. मात्र या गर्दीवर कुणाचेही नियंत्रण नव्हते. नागरिक बिनधास्तपणे दुचाकीवरून डबल सीट जाताना दिसत होते. बसस्थानक चौकात वाहतूक पोलिसांनी अशा चालकांना रोखण्याचा प्रयत्न केला. काहींना दंडही ठोठावला. तरीही गर्दीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. त्यातच शनिवारी नागपंचमी असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर दुकानात गर्दी केली होती. यानंतर १ ऑगस्टला बकरी ईदचा सण येत आहे. तत्पूर्वी ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे.

भाजीपाल्याचा तुटवडा
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भाजी मंडईत पहाटे ३ वाजतापासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकांनी आठवडाभराचा भाजीपाला खरेदी केल्याने काही वेळातच संपूर्ण भाजीपाला संपला. त्यामुळे अनेकांना परत जावे लागले. मात्र गर्दीमुळे शहरात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. लॉकडाऊनच्या सात दिवसानंतर शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता अनेकांनी वर्तविली आहे.

Web Title: Yavatmalkars, do you buy groceries or Corona?