शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळची बाजारपेठ तब्बल ५० दिवसानंतर उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

२२ मार्चपासून यवतमाळ शहरात बाजारपेठेसह सर्व परिसर कडकडीत बंद होता. संपूर्ण शहर निर्मनुष्य झाले होते. तब्बल ५० दिवसानंतर यवतमाळातील बाजारपेठ अंशत: उघडली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी बाजारपेठेत सर्वत्र चहलपहल दिसत होती. कापडासह इतरही काही दुकाने उघडल्याने नागरिक ग्रामीण भागातून खरेदीसाठी आले होते.

ठळक मुद्दे२२ मार्चनंतर पहिल्यांदाच चहलपहल : खरेदीसाठी ग्रामीण भागातूनही नागरिकांनी यवतमाळात घेतली धाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. यवतमाळ शहर तर कोरोना रुग्णांमुळे थेट रेडझोनमध्ये आले. २२ मार्चपासून यवतमाळ शहरात बाजारपेठेसह सर्व परिसर कडकडीत बंद होता. संपूर्ण शहर निर्मनुष्य झाले होते. तब्बल ५० दिवसानंतर यवतमाळातील बाजारपेठ अंशत: उघडली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी बाजारपेठेत सर्वत्र चहलपहल दिसत होती. कापडासह इतरही काही दुकाने उघडल्याने नागरिक ग्रामीण भागातून खरेदीसाठी आले होते.आतापर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. नंतर शेतीपयोगी साहित्य व बी-बियाण्यांची दुकाने उघडण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने हार्डवेअर, सिमेंट ही दुकाने सकाळी ८ ते १२ या वेळेत उघडण्याची मुभा दिली. रविवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने दुकाने उघडण्यासंदर्भात दिवस ठरवून दिले आहे. त्याचा पहिला दिवस सोमवार होता. आज कापड दुकानांसह जनरल स्टोअर्स व इतरही दुकाने उघडण्यात आली.जवळपास दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेली दुकाने उघडली. नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेतली. प्रत्येकजण तोंडाला मास्क बांधून होता. शक्यतोवर गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला जात होता. काही दुकानदारांनी स्वत:हून सर्कल आखून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी पुढाकार घेतला होता.शांत शहर गजबजलेएखाद्या युद्धाच्या परिस्थितीत जशी स्थिती निर्माण होते असाच काहीसा अनुभव गेल्या दीड महिन्यापासून यवतमाळकरांना आला. घराबाहेर पडले तरी कुणीच भेटत नव्हते. बाजारपेठही पूर्णत: शांत होती. चिरनिद्रेतून शहर जागे झाल्याचा आभास सोमवारी दुपारचे चित्र पाहून झाला.बाजारपेठेसह आता बँकाही सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत चालणारगत ५० दिवसांपासून यवतमाळची बाजारपेठ बंद होती. अत्यावश्यक सेवेची दुकाने १२ वाजेपर्यंत खुली होती. ही वेळ वाढवून आता दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने आणि बँकांचा व्यवहार सुरू राहणार आहे. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे. या उपाययोजनांच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये बाजारपेठ आळीपाळीने उघडण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहेत. यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत उघडी राहणार होती. आता ही दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहणार आहे. यामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषत: बँकेसमोर होणारी गर्दी वाढलेल्या वेळेमुळे नियंत्रणात येणार आहे. यासोबतच दुकानातील गर्दीही थांबणार आहे.

टॅग्स :Marketबाजार