यवतमाळ जिल्ह्यात विद्युत तारेच्या स्पर्शाने पितापुत्र जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:12 IST2020-06-05T11:11:46+5:302020-06-05T11:12:14+5:30

कवठाबाजार येथे विद्युत तारेच्या स्पर्शाने पितापुत्र जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली.

In Yavatmal district, a father and son were killed on the spot by the touch of a live electric wire | यवतमाळ जिल्ह्यात विद्युत तारेच्या स्पर्शाने पितापुत्र जागीच ठार

यवतमाळ जिल्ह्यात विद्युत तारेच्या स्पर्शाने पितापुत्र जागीच ठार

ठळक मुद्देमुलाला वाचवायला गेले वडिल


लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: कवठाबाजार येथे विद्युत तारेच्या स्पर्शाने पितापुत्र जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. येथील भावेश दत्तात्रय घुगे (२१) हा मुलगा पहाटे उठून बाथरूममध्ये गेला असता, तेथे अर्थिंगच्या तारेला त्याचा स्पर्श झाला. विजेचा जोरात झटका बसल्याने तो ओरडला. त्याचा आवाज ऐकून त्याचे वडील दत्तात्रय घुगे (५९) हे त्याच्या मदतीसाठी धावले. या दोघांनाही विजेच्या तारेचा स्पर्श होऊन ते जागीच ठार झाले. या दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या कैलास दहिफळे या त्यांच्या मामालाही गंभीर जखम झाली. दत्तात्रय घुगे हे निवृत्त वायरमन होते. या दोघांच्या निधनाबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: In Yavatmal district, a father and son were killed on the spot by the touch of a live electric wire

टॅग्स :Deathमृत्यू