'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 08:06 IST2026-04-23T08:04:46+5:302026-04-23T08:06:11+5:30

Mumbai Police: आयत्यावेळी कॉन्सर्टसाठी परवानगी देण्यास मुंबई पोलिसांनी स्पष्ट नकार दिला असून, आयोजकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, अशी कडक भूमिका देवेन भारती यांनी बुधवारी मांडली. 

'...then the concert is not allowed' Police Commissioner's stance; orders strict action | '...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश

'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई: आयत्यावेळी कॉन्सर्टसाठी परवानगी देण्यास मुंबई पोलिसांनी स्पष्ट नकार दिला असून, आयोजकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, अशी कडक भूमिका देवेन भारती यांनी बुधवारी मांडली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मोठ्या कॉन्सर्टसाठी आयोजक अनेक महिने आधीच प्रसिद्ध देशी-विदेशी कलाकार निश्चित करतात आणि स्थळही ठरवतात. मात्र, पोलीस व अन्य आवश्यक यंत्रणांकडे परवानगीसाठी अर्ज शेवटच्या तीन ते चार आठवड्यांत केला जातो, ही पद्धत यापुढे सहन केली जाणार नाही.

कायदा-सुव्यवस्थेची खबरदारी आवश्यक

भारती यांनी स्पष्ट केले की, कार्यक्रमाचे ठिकाण व कलाकार निश्चित होताच आयोजकांनी तातडीने परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कोणती खबरदारी घेतली जाईल, याची सविस्तर माहितीही सादर करावी लागेल. या निकषांवरच परवानगी देण्यात येईल. दरम्यान, बीकेसीतील एका कार्यक्रमाची परवानगी आयोजकांनी पूर्वपरवानगीशिवाय बुकिंग सुरू केल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आयोजकांना नियमांचे पालन करण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

कारवाई सुरूच राहाणार

नेस्को येथील ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर  मुंबई पोलिसांनी अतिरिक्त उपाययोजना आखल्या आहेत. तसेच या ड्रग्ज प्रकरणात सुरक्षारक्षकांशी संगनमत करून काही 
जणांनी अवैधरीत्या प्रवेश मिळवला होता. पाचजण ड्रग्ज घेऊन आले होते, त्यापैकी तिघांनी त्याचे सेवन केल्याचे समोर आले आहे. ड्रग्ज तस्करी व विक्रीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहाणार असल्याचा इशाराही भारती यांनी यावेळी दिला.

असे प्रकार रोखणारच

देवेन भारती यांनी सांगितले, गेल्या दहा वर्षांत मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात धडक कारवाया केल्या आहे. त्यांनी अनेक ड्रग्ज कारखाने उदध्वस्त केले आहेत. अशी एखादी घटना घडली म्हणून सर्वच पार्ट्या ड्रग्ज पार्ट्या नाहीत. तसेच नेस्को प्रकरणात ‘ॲक्सेस कंट्रोल’ हवा होता. यापुढे अशा घटना रोखण्यासाठी यापुढे विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.  

Web Title : समय पर आवेदन नहीं तो कॉन्सर्ट की अनुमति नहीं: पुलिस आयुक्त

Web Summary : मुंबई पुलिस अंतिम समय में कॉन्सर्ट की अनुमति नहीं देगी। आयोजकों को सुरक्षा योजनाओं के साथ तुरंत आवेदन करना होगा। एक बीकेसी कार्यक्रम की अनुमति समय से पहले बुकिंग के कारण रद्द कर दी गई। पुलिस नशीली दवाओं के मामलों पर सख्ती करेगी।

Web Title : No concert permits without timely application: Police Commissioner warns.

Web Summary : Mumbai police will deny last-minute concert permits. Organizers must apply promptly with detailed security plans. A BKC event permit was revoked for premature booking. Police will intensify drug enforcement, following a recent incident, focusing on access control to prevent future occurrences.