शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जम्बो भरतीची लेखी परीक्षा

By admin | Updated: November 22, 2014 01:56 IST

पेपरफुटीचे ग्रहण लागल्यानंतरही जिल्हा परिषदेतील पद भरती प्रक्रिया सुरळीत होत आहे.

यवतमाळ : पेपरफुटीचे ग्रहण लागल्यानंतरही जिल्हा परिषदेतील पद भरती प्रक्रिया सुरळीत होत आहे. या भरती प्रक्रियेतील शेवटच्या टप्प्यातील चार पदाच्या ४७ जागेसाठी तब्बल १९ हजार ७८० उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत. यासाठी ४७ परीक्षा केंद्र नियोजित केले आहेत. जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी सांख्यिकी या दोन जागेसाठी एक हजार २७३ उमेदवार असून, पाच केंद्र आहेत. लघुलेखक या दोन जागेसाठी ५१ उमेदवार असून, एक परीक्षा केंद्र आहे. कनिष्ठ लेखाधिकारी या तीन जागेसाठी ३०३ उमेदवार असून, एक परीक्षा केंद्र आहे. तर परिचराच्या ४० जागांसाठी १८ हजार १५३ उमेदवार आहेत. त्यांची लेखी परीक्षा घेण्यासाठी एकुण ९२ परीक्षा केंद्र आहेत. यापैकी ४७ केंद्रापैकी बाभूळगाव, कळंब, घाटंजी, नेर, दारव्हा, राळेगाव येथे आहेत. दुपारी २ ते ३.३० यावेळेत परिचर पदाचा लेखी पेपर घेतला जाणार आहे. या जम्बो परीक्षेसाठी जिल्हा निवड समितीकडून तयारी करण्यात आली आहे. पंचायत समितीस्तरासाठी सात संपर्क अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे तर सात गट विकास अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय यवतमाळ मुख्यालयी होत असलेल्या लेखी पेपरसाठी १० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभरतीच्या सुरूवातीलाच पेपर फुटल्याचा ठपका या भरती प्रक्रियेवर लागला होता. त्यानंतरही जिल्हा निवड समितीने नेटाने ही भरती प्रक्रिया कायम ठेवली. पेपरफुटीच्या सावटात असलेल्या या भरती प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा निवड समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवार असल्याने आसनव्यवस्थेचेही नियोजन त्याच पद्धतीने केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)