शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात महिला मजूर ठार, २४ जखमी

By admin | Updated: September 29, 2014 23:12 IST

मजुरांना घेऊन जात असलेले भरधाव वाहन उलटून झालेल्या अपघातात मजूर महिला ठार, तर २४ जण जखमी झाले. जखमीतील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे.

चार गंभीर : कळंब येथील घटनाकळंब : मजुरांना घेऊन जात असलेले भरधाव वाहन उलटून झालेल्या अपघातात मजूर महिला ठार, तर २४ जण जखमी झाले. जखमीतील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजता येथील विद्युत कंपनीच्या कार्यालयाजवळ घडली.एमएच-२९ टी ६४७६ या चारचाकीने तालुक्यातील पिंपळगाव (रुईकर) आणि यवतमाळ तालुक्याच्या पारवा येथील महिला मजूर परसोडी (बु.) येथील प्रशांत ढाले यांच्या शेतात कामासाठी जात होते. दरम्यान, राळेगाव रोडवरील विद्युत कंपनीच्या कार्यालयाजवळील वळणावर ही गाडी उलटली. या अपघातात चंद्रभागा शहागडे (६५) रा.पिंपळगाव ही महिला ठार झाली. उमा बिरडकर (४०), निर्मल उमाटे, लता शिंदे, अनिता सरगट यांची प्रकृती गंभीर आहे.गोकर्णा तुडवे, दीक्षा भागडकर, नंदा वाघाडे (३५), नंदा काळसर्पे, सीता वाघाडे, सिंधू जुनघरे, सीमा साहारे, बेबी शेंदरे, राधा तायडे, तारा राऊत, पार्वता नेहारे, मंदा कळसपुरे (६०), तानाबाई राऊत (६५) सोनू शहागडे (२०) रा.सर्व पिंपळगाव आणि कुसुम वाघमारे, वैशाली वाघमारे, गीता मून, वंदना पाटील, प्रभा वानखडे, शोभा पलंगे, कुसूम भगत रा. सर्व पारवा या जखमी झाल्या. जखमींना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना यवतमाळ येथे हलविण्यात आले. याप्रकरणी चालक प्रकाश पंजाब तिखे याच्याविरुध्द कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)