शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्की ठरली ‘फ्लॉप शो’

By admin | Updated: October 7, 2014 23:42 IST

वीज पुरवठा खंडित काळात कामात व्यत्यय येवू नये यासाठी येथे बसविण्यात आलेली पवनचक्की फ्लॉप शो ठरली आहे. गेली दोन महिन्यांपासून तहसील कार्यालयाच्या आवारात असलेली ही वस्तू केवळ

राळेगाव : वीज पुरवठा खंडित काळात कामात व्यत्यय येवू नये यासाठी येथे बसविण्यात आलेली पवनचक्की फ्लॉप शो ठरली आहे. गेली दोन महिन्यांपासून तहसील कार्यालयाच्या आवारात असलेली ही वस्तू केवळ देखावा ठरत आहे. तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेण्यात आली नाही. सध्या निवडणुकीचे कामकाज सुरू आहे. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्यास त्यात व्यत्यय येत आहे. लाखो रुपये खर्च करून येथील तहसील कार्यालयात पवनऊर्जेवर चालणारे टॉवर उभे करण्यात आले. याद्वारे विद्युत निर्मितीही सुरू झाली. काही दिवस या कार्यालयाला वीज मिळालीही. मात्र गेली दोन महिन्यांपासून हा पवनऊर्जा संच अचानक बंद पडला. ही बाब तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी संबंधित विभागाला कळविली. परंतु अजूनही हा संच दुरुस्त करण्यात आलेला नाही. येथील तहसील कार्यालयात ७७ राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे मुख्यालय आहे. कळंब, बाभूळगाव, राळेगाव येथील कर्मचारी, उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी या ठिकाणाहून काम सांभाळत आहे. मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने कामाच्या गतीला ब्रेक लागला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्याय म्हणून असलेला ऊर्जा संचही बंद आहे. त्यामुळे साधे लाईटसुद्धा सुरू होत नाही. मेणबत्तीच्या उजेडात काम भागवावे लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी पवनऊर्जेवर वीज निर्मितीचा प्रयोग सुरू झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आता शासकीय कार्यालयांच्या कामकाजात विजेअभावी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, अशी आशा त्यांना होती. मात्र अवघ्या काही दिवसातच त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. पवनऊर्जा संच दोन महिन्यातच बंद पडला. त्यातून कुठलीही वीज निर्मिती होत नाही. केवळ दोन महिन्यात हा संच कसा बंद झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्नही कुणाकडून झाला नाही. मात्र यासाठी झालेला लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ ठरल्याचे चित्र सध्या तरी आहे. (प्रतिनिधी)