शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही

By admin | Updated: August 31, 2015 02:12 IST

आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये अनेक जाती शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. ते आदिवसींचे आरक्षण मागत आहे.

विष्णू सावरा : आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव व प्रबोधन यवतमाळ : आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये अनेक जाती शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. ते आदिवसींचे आरक्षण मागत आहे. मात्र आदिवासींच्या ४५ जातींमध्ये कुठल्याही नवीन जातीला शिरु देणार नाही. मी असे पर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी येथे केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा, पुसद तसेच आदिवासी विद्यार्थी संघ, आयनेट बहुद्देशीय संस्था, इंडिजीनस स्टुडंट फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने येथील पोस्टल मैदानावर आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. महोत्सवाचे उद्घाटन धारणीचे आमदार प्रभूदास भिलावेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त संभाजी सरकुंडे, आदिवासी अपर आयुक्त अशोक आत्राम, आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी उल्हास सकवान, बी.जी. डाखोरे, डॉ. अरविंद कुडमेथे, संतोष पेंदाम, भाजपा जिल्हाध्यक्ष राजू डांगे, उद्धव येरमे, बाबाराव मडावी, सुरेश चिंचोळकर, किरण कुमरे, विठोबा मसराम आदी उपस्थित होते. ना. सावरा म्हणाले, आदिवासी बांधवांमध्ये ऐक्य दिसत नाही. त्यामुळेच अनेक समाज आदिवासी समाजामध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींच्या ४५ जाती एकत्र आल्यातर कुणाचीही आदिवासींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. आपसातील मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाची अधिक संख्या असलेल्या गावांना आपल्या गावाचा विकास करता यावा यासाठी पेसा कायद्यांतर्गत अशा गावांना निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (शहर वार्ताहर) आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनीआदिवासी विद्यार्थी आयएएस, आयपीएस झाले पाहिजे, त्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आदिवासी विद्यार्थी काटक, कणखर आहे. त्यांना चांगले प्रशिक्षण दिल्यास खेळात ते चांगली प्रगती करू शकतात. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात येणार असल्याचे ना. सावरा यांनी सांगितले. शिक्षण विभाग खेळात नाविन्यप्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देते. याच धर्तीवर आदिवासी विभागाच्या शाळेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी घोषणाबाजी आदिवासी विकास मंत्र्यांनी आपले प्रश्न सोडवावे म्हणून कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच काही विद्यार्थी घोषणाबाजी करीत होते. यातील काही विद्यार्थी तर स्टेजवरही पोहोचले. त्यांनी शिष्यवृत्ती आणि वसतिगृहाच्या निर्मितीचा प्रश्न मंत्र्यांपुढे मांडला. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.