शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फुलसावंगीत पतीपाठोपाठ पत्नीनेही जीवनयात्रा संपविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST

फकीरा गणपत पिटलेवाड (३२) असे मृत पतीचे नाव आहे. तर नीलाबाई फकीरा पिटलेवाड (२५) असे मृत पत्नीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी फकीराची आई व पत्नी नीलाबाईच्या माहेरी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्या दोघीही घरी परतल्या. मात्र त्यांना फकीरा आढळला नाही.

ठळक मुद्देकारण गुलदस्त्यात : ऐन दसऱ्याच्या दिवशी शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्कफुलसावंगी : पतीचा मृतदेह विहिरीत आढळल्याची वार्ता कळताच पत्नीनेही गळफास लावून जीवन यात्रा संपविली. ही घटना फुलसावंगी येथे मंगळवारी ऐन दसºयाच्या दिवशी घडली.फकीरा गणपत पिटलेवाड (३२) असे मृत पतीचे नाव आहे. तर नीलाबाई फकीरा पिटलेवाड (२५) असे मृत पत्नीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी फकीराची आई व पत्नी नीलाबाईच्या माहेरी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्या दोघीही घरी परतल्या. मात्र त्यांना फकीरा आढळला नाही. त्यांनी सर्वत्र विचारपूस केली. मात्र फकीरा कुठेही आढळला नाही. मंगळवारी सकाळी गावातील सार्वजनिक विहिरीत एक मृतदेह तरंगत असल्याची वार्ता पसरली. फकीराच्या आईने विहिरीवर जाऊन बघितल्यानंतर तो मृतदेह फकीराचाच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळताच फकीराची पत्नी नीलाबाई हिने विरहाच्या कल्पनेने राहत्या घरी गळफास लावला. यात नीलाबाईचा मृत्यू झाला.ऐन दसऱ्याच्या दिवशी गावात दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र शोककळा पसरली होती. गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. मृत फकीराच्या वृद्ध आईवर दु:खाचा डोंगर कोसळला. पंचनामा केल्यानंतर दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महागावला रवाना करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी दोघांवरही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यू