शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त केव्हा निघणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:42+5:30

जिल्ह्यात अजूनही हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विकणे बाकी आहे. खरिपाच्या तयारीसाठी बी-बियाणे घेण्याकरिता धडपडत आहे. मात्र शेतमाल घरीच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहे. हरभऱ्याची खरेदी सुरू न झाल्याने तो विकायचे कोठे, खुल्या बाजारात विकल्यास व्यापारी अतिशय कमी दरात तो खरेदी करत आहे. हरभऱ्याचे यावर्षी समाधानकारक उत्पन्न झाले.

When will the moment of government gram purchase come? | शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त केव्हा निघणार?

शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त केव्हा निघणार?

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : प्रशासनाला हवे गोदाम, पावसाळा तोंडावर तरी हरभरा घरातच

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : शेतकऱ्याच्या कापूस व तूर खरेदीच्या अडचणीनंतर आता हरभरा खरेदीचा विषय गंभीर झाला आहे. पावसाळा तोंडावर असतानाही रबी हंगामात निघालेले हरभऱ्याचे पीक अजूनही घरात पडून आहे. शासन हरभरा खरेदी कधी सुरू करते, त्यांना मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.
जिल्ह्यात अजूनही हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विकणे बाकी आहे. खरिपाच्या तयारीसाठी बी-बियाणे घेण्याकरिता धडपडत आहे. मात्र शेतमाल घरीच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहे. हरभऱ्याची खरेदी सुरू न झाल्याने तो विकायचे कोठे, खुल्या बाजारात विकल्यास व्यापारी अतिशय कमी दरात तो खरेदी करत आहे. हरभऱ्याचे यावर्षी समाधानकारक उत्पन्न झाले. मात्र शासनाने हमी भावात हरभरा खरेदी केंद्र सुरू न केल्याने व्यापाऱ्यांना कमी भावात हरभरा विकावा लागत आहे. चार हजार ७०० रुपये हरभऱ्याचा आधारभूत भाव आहे. मात्र पैशांची गरज लक्षात घेता शेतकऱ्यांना तो तीन ते साडेतीन हजारातच खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. शासन व व्यापारी शेतकऱ्यांच्या पाटावर व पाठीवर असे दोनही बाजूने मारण्याचे काम सुरू आहे. गोडावून उपलब्ध नसल्याच्या कारणावरून हरभरा खरेदी होवू शकले नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी धामणगाव येथील गोडावून आरक्षित केले आहे. आता त्या गोडावूनमध्ये रासायनिक खताचा साठा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या गोडावूनचा अजूनही जिल्ह्याला ताबा मिळालेला नाही. तो कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गोदामांअभावी थांबली हरभरा खरेदी : व्हीसीएमएस
गोडावून उपलब्ध नसल्यामुळे हरभरा खरेदी थांबली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. वरिष्ठ पातळीवरच माहिती देण्यात आली आहे. लवकर हरभरा खरेदी सुरू होईल, अशी माहिती ‘व्हीसीएमएस’चे जिल्हा व्यवस्थापक अमोल राजगुरे यांनी दिली.

शेतकरी संघर्ष समिती आक्रमक
शेतकरी अनेक अडचणीत अडकला आहे. यात हरभरा खरेदीस दिरंगाई करून तो पुन्हा पिचला जाणार आहे. त्यामुळे हरभरा खरेदी तत्काळ व्हावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने कळंब बाजार समिती सभापती प्रवीण देशमुख, अशोक गोबरे, वसंत घुईखेडकर, नानाभाऊ गाडबैले, सुरेश चिंचोळकर, बालू पाटील दरणे, दिनेश गोगरकर, आनंदराव जगताप, घनश्याम दरणे, जयंत घोगे, अनिल गायकवाड आदींनी केली. लवकर हरभरा खरेदी करून त्याचा मोबदला शेतकºयांना द्यावा, खरिपाच्या बी-बियाणे खरेदीसाठी तो पैसा कामात येईल, असे निवेदनात नमूद आहे.

Web Title: When will the moment of government gram purchase come?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी