शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

केळी उत्पादनातून शोधला प्रगतीचा मार्ग

By admin | Updated: April 20, 2015 00:09 IST

नैसर्गिक असमतोलामुळे पारंपरिक शेती करणारे शेतकरी देशोधडीला लागले असताना तालुक्यातील एका शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून..

दुष्काळी परिस्थितीवर मात : बिजोराच्या श्रीराम ठाकरे यांनी एकरी दोन लाखांचे घेतले उत्पन्न मुकेश इंगोले  दारव्हानैसर्गिक असमतोलामुळे पारंपरिक शेती करणारे शेतकरी देशोधडीला लागले असताना तालुक्यातील एका शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळीच्या उत्पादनातून प्रगतीचा मार्ग शोधला आहे. या पिकातून तो एकरी दोन लाख रुपयाचे उत्पन्न घेत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करीत हा प्रयोग यशस्वी झाल्याने अनेकांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे. श्रीराम गुलाबराव ठाकरे रा. बिजोरा असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे २२ एकरी वडिलोपार्जीत शेती आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांच्यावर शेतीचा भार पडला. कोरडवाहू शेतीमुळे उत्पन्न होत नव्हते म्हणून सुरूवातीला त्यांनी शेतातील पडकी विहीर दुरूस्त केली व त्यावरून ओलित सुरू केले. भाजीपाल्याचे चांगले उत्पन्न झाल्याने त्यांचा उत्साह वाढला. त्यानंतर नवीन विहीर खोदून ओलिताच क्षेत्र वाढविल. परंतु नंतरच्या कालावधीत पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली विहिरीचे पाणी कमी पडू लागले. त्यामुळे त्यांनी या अडचणीवर मात करण्याकरिता शेतीमध्ये आधुनिकतेचा वापर करण्याचे ठरविले. २००८ मध्ये तीन एकरात ड्रीप टाकून सीमला मिरचीची लागवड केली. त्यामुळे व्यवस्थीत ओलित व्हायला लागले, तसेच उत्पन्नातही भर पडली. परंतु अशा प्रकारचे पीक घेताना मजुराची अडचण निर्माण झाली. म्हणून ज्या पिकाला मजूर लागणार नाही आणि खर्चाच्या तुलनेत उत्पन्न जास्त होईल या पिकाची लागवड करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी छत्तीसगड रायपूर, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून संपूर्ण अभ्यास केला. तेव्हा केळीच्या पिकाबद्दल माहिती मिळाली. त्यावरून जळगाव येथून टिश्यू कल्चरचे रोप बोलावून दोन एकरात केळीची लागवड केली. त्यावर ड्रीप, शेणखत, रासायनिक खत व इतर असा एकरी ५० हजार रुपये खर्च केला आणि उत्पन्न दोन लाख रुपये आले. या पिकाला मजूर लागत नाही. शिवाय नैसर्गिक संकटात रिस्क कमी आहे व खर्चाच्या तुलनेत उत्पन्न चांगले. त्यामुळे पुढे क्षेत्र वाढवून चार एकरात केळीची लागवड केली आणि यावर्षी आणखी तीन एकरात लागवडीचे नियोजन केले आहे. केळीच्या यशस्वी उत्पादनाबद्दल श्रीराम ठाकरे यांचा जळगाव येथे गौराई नवतंत्र केळी पुरस्कार देऊन कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरूवातीच्या काळात निसर्गाच्या भरवशावर शेती करून परंपरागत पिके घेत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आल्याचे ते सांगतात. परंतु त्यामुळे खचून न जाता शेतीमध्ये आधुनिकतेचा वापर केल्याने यश संपादन करता आले. नैसर्गिक संकटात जी पिके या संकटाशी दोन हात करू शकतात. त्याचीच निवड करणे गरजेचे आहे आणि केळीच्या पिकात फार कमी रिस्क असल्याचे ते आपल्या अनुभवातून सांगतात. या पिकामुळे त्यांच्या घरात समृद्धी आली आहे व हिच समृद्धी इतर शेतकऱ्यांच्या घरात नांदावी यासाठी ते मार्गदर्शकाची भूमिका बजावीत आहे. तालुक्यात जवळपास १०० एकरात केळीची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनात केळीकडे वळत आहे. आज एवढे वय झाले असतानाही शेतीसाठीची श्रीराम ठाकरे यांची धडपड वाखाण्याजोगी आहे.