मैतापूर गावात जाणारी वाट अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:00:16+5:30

गेल्या कित्येक वर्षापासून या गावासाठी रस्ता नाही. गावातील लोकांनी यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतु कोणीही याकडे लक्ष दिले नाही. मार्गात एक नाला लागतो. काही महिन्यांपूर्वी नाल्यावर तात्पुरत्या स्वरुपाचे ढोले टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आला. पहिल्याच पावसात या रस्त्याची पुरती ‘वाट’ लागली. गावातील कोणाला रुग्णालयीन अथवा महत्वाच्या कामालासाठी वाहनाने जायचे म्हटले तर जाता येत नाही.

The way to Maitapur village is difficult | मैतापूर गावात जाणारी वाट अवघड

मैतापूर गावात जाणारी वाट अवघड

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : आदिवासीबहुल गाव, पांदण रस्त्यालाही लाजविणारा मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : मैतापूर हे कळंब तालुक्यातील छोटेशे गाव. केवळ २५ घरांची वस्ती. संपूर्ण गाव आदिवासीबहुल. त्यामुळेच की काय या गावात अजूनही यायला-जायला रस्ता तयार करण्यात आला नाही. लोकप्रतिनिधींना वारंवार सांगुनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता तर ‘कोणी रस्ता देता का रस्ता’ अशी म्हणण्याची वेळ या गावातील नागरिकांवर आली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून या गावासाठी रस्ता नाही. गावातील लोकांनी यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतु कोणीही याकडे लक्ष दिले नाही. मार्गात एक नाला लागतो. काही महिन्यांपूर्वी नाल्यावर तात्पुरत्या स्वरुपाचे ढोले टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आला. पहिल्याच पावसात या रस्त्याची पुरती ‘वाट’ लागली. गावातील कोणाला रुग्णालयीन अथवा महत्वाच्या कामालासाठी वाहनाने जायचे म्हटले तर जाता येत नाही. गाडी घेऊन कोणी बाहेर निघू शकत नाही किंवा गावात जाऊ शकत नाही.
शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन शेतात जाताना मोठी कसरत करावी लागते. शेती साहित्य वाहून नेणे मोठे जिकरीचे काम असते. कोरोनामुळे विद्यार्थी घरीच आहे. अन्यथा त्यांच्या शाळेत जाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असता. येथील रस्ता तातडीने तयार करण्याची गरज आहे. पक्का नाही तर केवळ वाहतुकीयोग्य तरी रस्ता तयार करावा, अशी मागणी पोलीस पाटील राजू पाटील, रवींद्र देवतळे, अंकुश नरुले, विश्वेश्वर मडावी, विष्णू मडावी, अक्षय जुगनाके, गणेश जुगनाके, विलास मडावी, दीपक चांदेकर, सुरज जुगनाके, भीमराव किनाके, बाबाराव मडावी, उत्तम जुगनाके, वासुदेव जुगनाके आदी गावकऱ्यांची केली आहे.

Web Title: The way to Maitapur village is difficult