शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कापूस परजिल्ह्याच्या वाटेवर

By admin | Updated: November 30, 2015 02:14 IST

दीर्घ प्रतीक्षेनंतरही पणन महासंघाचे कापूस संकलन केंद्र जिल्ह्यातील अनेक भागात सुरू झाले नाही.

उत्पादकांची चिंंता वाढली : पणनच्या नवीन संकलन केंद्रांची प्रतीक्षा, शेतकरी चालले कापूस घेऊन पुन्हा आदिलाबादकडेयवतमाळ : दीर्घ प्रतीक्षेनंतरही पणन महासंघाचे कापूस संकलन केंद्र जिल्ह्यातील अनेक भागात सुरू झाले नाही. अशातच स्थानिक व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडले. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांंकडे वळविला आहे. याचा फटका बाजार समितीच्या सेस फंडाला बसण्याचा धोका आहे. जिल्ह्यामध्ये चार लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली. सर्वात मोठे क्षेत्र हे कापूस लागवडीचे आहे. खरीप हंगामातील सर्वात मोठे पीक म्हणून कापसाकडे पाहीले जाते. शेतकऱ्यांचे संपूर्ण गणित कापसाच्या खरेदी विक्रीवरच अवलंबून आहे.पणन महासंघाने ४१०० रूपये क्विंटल कापसाचे दर जाहीर करताच व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडले. जिल्ह्यातील शेतकरी ३८०० ते ४००० रूपये क्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहेत. तर परजिल्ह्यातील व्यापारी ४१०० रूपये क्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहेत.स्थानिकांच्या तुुलनेत हा दर ३०० रूपयाने अधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकाऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना शह देण्यासाठी परजिल्ह्यात कापूस विक्रीसाठी नेण्यास प्रारंभ केला आहे. यवतमाळचा कापूस अमरावतीकडे मोठ्या प्रमाणात जात आहे. यासोबत काही प्रमाणात आंध्र प्रदेशाकडेही कापूस जात आहे.व्यापाऱ्यांच्या धोरणाने बाजार समितीकडे जाणारा कापूस परजिल्ह्याकडे वळत आहे. यामुळे बाजार समित्यांचा सेस मोठ्या प्रमाणात बुुडणार आहे. याचा फटका बाजार समितीच्या व्यवस्थापनालाही बसणार आहे. (शहर वार्ताहर)