शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई कृती आराखडा २१ लाखांचा

By admin | Updated: May 15, 2014 23:58 IST

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कळंब तालुक्यासाठी २१ लाख रु पयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

कळंब : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कळंब तालुक्यासाठी २१ लाख रु पयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. कृती आराखड्याची किंमत लक्षात घेता यावर्षी प्रशासनाच्या लेखी पाणीटंचाईची तीव्रता कमी असल्याचे दिसून येते.

यामध्ये तालुक्यातील १३ गावात नवीन विंधन विहीर घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यासाठी ७ लाख ८0 हजार रूपये खर्च अपेक्षित होता. परंतु केवळ देवनळा आणि मंगरूळ या गावांमध्येच नवीन विंधन विहीर घेण्याला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी १ लाख २0 हजार रूपये खर्च केले जाणार आहे.

तसेच ९ गावात नळयोजनेची विशेष दुरूस्ती केली जाणार आहे. यासाठी ९ लाख रूपये खर्च केले जाणार आहे. यामध्ये किन्हाळा, नांझा, निलज, नरसापूर, पोटगव्हाण, पिंपळगाव, बर्‍हाणपूर, धोत्रा व डोंगरखर्डा या गावांचा समावेश आहे.

विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करण्यासाठी २६ गावे प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु यापैकी एकाही कामाला मंजुरात देण्यात आली नाही. तालुक्यातील १४ गावातील १५ खासगी विहीर अधिग्रहन करण्याचा प्रस्ताव होता. परंतु वटबोरी, जोडमोहा, बेलोरी, गांढा, मोहदरी या गावातील विहिरींचेच अधिग्रहण केले जाणार आहे. यासाठी १ लाख ३५ हजार रूपये खर्च केले जाणार आहे. ६ गावातील विहिरींचे खोलीकरण व गाळ काढण्यात येणार आहे. यामध्ये मलकापूर, कोठा, कळंब, पिंपळखुटी, मेंढला व पार्डी (सावळापूर) या गावांचा समावेश आहे. यासाठी १ लाख ८0 हजार रूपये खर्च केले जाणार आहे.

तालुक्यातील १0 गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये खटेश्‍वर किनवट, कैलासपूरी, कोठा, कळंब, प्रधानबोरी, मार्कंंडा, पंगडी, पिढा व गणेशवाडी या गावांचा समावेश आहे. यासाठी ७ लाख ५0 हजार रूपये खर्च होणार आहे. तालुक्यातील गावांमध्ये ४९५ हातपंप असून यापैकी १४ कायम बंद झालेले आहे. पैकी ३ हातपंप नादुरूस्त आहे. ४१४ सार्वजनिक विहिरी असून त्यापैकी १९ विहीरी नादुरूस्त आहे. ५३ पाणी पुरवठय़ाच्या नळयोजना असून सर्वच नळयोजना सुस्थितीत सुरू असल्याचे पंचायत समिती प्रशासनाचे म्हणणे आहे.

असे असले तरी मागील वर्षी समाधानकार पाऊस पडल्याने यावर्षी तेवढी पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार नाही. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी कमी राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)