शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

पूस काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST

शहरवासीयांची तहान भागविणारे पूस धरण पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे. तूर्तास धरणात ९६.६९ टक्के पाणीसाठा झाला आहे. शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा आजपर्यंत ६०१.०८ मिमी पाऊस कोसळला आहे.

ठळक मुद्देधरण ‘ओव्हर फ्लो’ : १०० टक्के पाणीसाठा, पूस नदीला आला दुथडी पूर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पुसदकरांची तहान भागविणारे पूस धरण ९६.६९ टक्के भरले आहे. धरण कोणत्याही क्षणी पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.शहरवासीयांची तहान भागविणारे पूस धरण पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे. तूर्तास धरणात ९६.६९ टक्के पाणीसाठा झाला आहे. शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा आजपर्यंत ६०१.०८ मिमी पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी १७ ऑगस्टला धरणात केवळ ३९.६९ टक्के जलसाठा होता. त्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.पूस धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने पूस नदीला पूर येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदी काठावरील चिखली (कॅम्प), वनवार्ला, बान्शी, येरंडा, सावंगी, रंभा, पिंपळगाव (शेलू), कोप्रा (भोजला) आदी गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच ही नदी शहरातून वाहत असल्याने नदी काठावरील शहरवासीयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पूस धरण कधीही ओव्हर फ्लो झाल्यास नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नदी काठावरील नागरिकांनी आपली निवासस्थाने काढून घ्यावी, जीवित वित्त हानी टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, नदीलगतची घरे सूचना मिळताच खाली करावी. अन्यथा कोणतीही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड यांनी स्पष्ट केले.पुसद तालुक्यातील जनजीवन विस्कळीतगेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र पूस धरणात पाणीसाठा वाढल्याने नदी काठावरील गावांमधील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच पुसदवासीयांमध्येही धरण भरल्याने समाधान आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शहरवासीयांना सूर्यदर्शनसुद्धा झाले नाही.

टॅग्स :Rainपाऊस