शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

पूस नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST

शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या पूस धरणात तूर्तास ९८ टक्के पाणीसाठा आहे. शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ७५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी १७ ऑगस्टला  धरण ओव्हर फ्लो झाले होते. त्या तुलनेत यंदा जुलै महिन्यातच  पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील जनजीवन विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पुसदकरांची तहान भागविणारे पूस धरण ९८ टक्के भरले आहे. धरण कोणत्याही क्षणी पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या पूस धरणात तूर्तास ९८ टक्के पाणीसाठा आहे. शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ७५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी १७ ऑगस्टला  धरण ओव्हर फ्लो झाले होते. त्या तुलनेत यंदा जुलै महिन्यातच  पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.पूस धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने पूस नदीला पूर येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदी काठावरील चिखली (कॅम्प), वनवार्ला, बान्शी, येरंडा, सावंगी, रंभा, पिंपळगाव (शेलू), कोप्रा (भोजला) आदी गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. ही नदी शहरातून वाहत असल्याने नदीकाठावरील शहरवासीयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पूस धरण कधीही ओव्हर फ्लो झाल्यास नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नदीकाठावरील नागरिकांनी आपली निवासस्थाने काढून घ्यावीत, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, नदीलगतची घरे सूचना मिळताच खाली करावीत, अन्यथा कोणतीही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांनी स्पष्ट केले.

तालुक्यातील जनजीवन विस्कळीतगेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, पूस धरणात पाणीसाठा वाढल्याने नदीकाठावरील गावांमधील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुसदवासीयांमध्येही धरण भरल्याने समाधान आहे. तालुक्यात आजपर्यंत ३९४.५ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर