शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

खरिपातील नुकसानीच्या दीड कोटींची प्रतीक्षा

By admin | Updated: May 30, 2015 02:36 IST

तालुक्यात २०१४ च्या खरीप हंगामामध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना मदत म्हणून तालुक्यासाठी १५ कोटी मंजूर झाले.

घाटंजी : तालुक्यात २०१४ च्या खरीप हंगामामध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना मदत म्हणून तालुक्यासाठी १५ कोटी मंजूर झाले. त्यापैकी १२ कोटी २७ लाख ३० हजार रुपये वितरित झाले आहे. त्या उपरही तालुक्याला आणखी एक कोटी ३० लाख रुपयांची गरज आहे. तशी मागणीसुद्धा तालुका प्रशासनाने केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २७ मार्चपर्यंत २ हजार २७० शेतकऱ्यांनी १२ कोटी २७ लाख ३० हजारांची मदत घेतली. मात्र या वेळेत अनेक खातेदारांच्या याद्या व त्यांचे खाते क्रमांक प्राप्त न झाल्याने आलेल्या निधीतील तीन कोटी रुपये परत गेले. त्यामुळे बरेच शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. अशा शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ८२ गावातील १ हजार ६०७ शेतकरी निवडण्यात आले आहे. त्यांना ८७ लाख रुपये मदत दे१णे बाकी आहे. निधी प्राप्त होताच त्यांना ही मदत मिळणार आहे. यात ९४६ अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांना ५७ लाख १० हजार ५८५ रुपये, बहुभूधारक ६५८ शेतकऱ्यांना २९ लाख ५८ हजार रुपये दिले जाणार आहे. फळ पिकांचे दोन खातेदार असून, त्यांना २४ हजार रुपये दिले जाणार आहे. तालुक्यातील १२२ गावांमध्ये ८२ गावांच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. त्यात दुष्काळग्रस्त आणखी ४० गावांचा समावेश होणार आहे. या सर्व वंचित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तालुका प्रशासनाने एक कोटी ३० लाखांची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना ही मदत त्वरित मिळाल्यास या खरीप हंगामात बी-बियाणे व खत खरेदी करता येईल. या मदतीकडे बुडत्याल काठीचा आधार या भावनेने शेतकरी वाट पाहत आहेत. (तालुका प्रतिनिधी)