शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

१४६३ कामगारांना स्वगृही परतण्याचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील विविध कॅम्पमध्ये मजूर आश्रयला आहेत. ७८४ कामगार झारखंडचे आहेत. १७५ कामगार पश्चिम बंगालचे आहेत. तर ५०४ कामगार बिहार राज्यातील आहे. या कामगारांना स्वगृही परतायचे आहे. मात्र स्वतंत्र वाहनाची व्यवस्था त्यांना करता आली नाही. या कामगारांकरिता आता मोफत रेल्वे सोडली जाणार आहे. अमरावतीवरून १३ मे रोजी झारखंडच्या ट्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देवेळापत्रकच नाही : वाहनांसाठी पैसे नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या कामगाराची नोंद आरोग्य विभाग करीत आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. त्यांना १४ दिवसाकरिता क्वारंटाईन राहण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यात ४,७९१ कामगारांची नोंद करण्यात आली आहे. तर १,४६३ कामगारांना स्वगृही परत जायचे आहे. त्याकरिता त्यांना अडचणी सोसाव्या लागत आहे.आतापर्यंत जिल्ह्यात बाहेर राज्यातून १,८५५ कामगार परतले आहेत. तर राज्यातील इतर जिल्ह्यातून २९३६ कामगार जिल्ह्यात परतले आहेत. त्यांच्या आरोग्याची पुढील १४ दिवस तपासणी करण्यात येणार आहे.यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील विविध कॅम्पमध्ये मजूर आश्रयला आहेत. ७८४ कामगार झारखंडचे आहेत. १७५ कामगार पश्चिम बंगालचे आहेत. तर ५०४ कामगार बिहार राज्यातील आहे. या कामगारांना स्वगृही परतायचे आहे. मात्र स्वतंत्र वाहनाची व्यवस्था त्यांना करता आली नाही. या कामगारांकरिता आता मोफत रेल्वे सोडली जाणार आहे. अमरावतीवरून १३ मे रोजी झारखंडच्या ट्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र याचे वेळापत्रक निश्चित नाही. यामुळे मजुरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.कामगारांना स्वगृही पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. रेल्वेचे वेळापत्रक मिळताच या मजुरांना त्या रेल्वेस्थानकापर्यंत पोहचविण्यात येणार आहे.- ललितकुमार वºहाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या