शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाघापूर व पिंपळगाव परिसरात भूमिगत गटारांची कामे दर्जाहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST

वाघापूर आणि पिंपळगाव परिसरात भूमिगत गटाराची कामे हाती घेण्यात आली आहेत. मनमानी पध्दतीने काम केले जात आहे. नागरिकांच्या होणाºया नुकसानीचा कुठलाही विचार केला जात नाही. पिण्याच्या पाण्याचे नळ खोदकाम करताना तुटले. जोडून देण्याचे सौजन्य तर दूर, अरेरावीची भाषा वापरली जात आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनागरिकांच्या तक्रारी दुर्लक्षित । खोदलेल्या नाल्यांमध्ये सांडपाणी, आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात होत असलेले भूमिगत गटाराचे काम दर्जाहीन होत आहे. निकृष्ट सिमेंट, विटा वापरल्या जात आहे. खोदकामही नियमबाह्य करण्यात येत आहे. क्युरीन केले जात नाही. या कामावर देखरेखीसाठी अनुभवशून्य लोकं ठेवण्यात आले आहे. खोदलेल्या नाल्या बुजविल्या जात नाही. त्यामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांनी केलेल्या या तक्रारींकडून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.वाघापूर आणि पिंपळगाव परिसरात भूमिगत गटाराची कामे हाती घेण्यात आली आहेत. मनमानी पध्दतीने काम केले जात आहे. नागरिकांच्या होणाºया नुकसानीचा कुठलाही विचार केला जात नाही. पिण्याच्या पाण्याचे नळ खोदकाम करताना तुटले. जोडून देण्याचे सौजन्य तर दूर, अरेरावीची भाषा वापरली जात आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. सदर योजनेच्या यशस्वीतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. योजना फेल गेल्यास वसाहतींमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव होऊन अनेक आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खोदकाम केलेले रस्तेही योग्यरित्या बुजविले गेले नसल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे.नियमानुसार काम होत नाही. अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात नाही. त्यामुळे या कामाची खरी परीक्षा योजना कार्यान्वित झाल्यावरच होणार आहे. जेसीबीने खड्डे खोदून ठेवले गेले आहेत. त्यामध्ये कित्येक नागरिक रात्रीच्या अंधारामध्ये पडले आहेत. विशेषत: प्राणीही बांधलेल्या टाक्यामध्ये पडल्याचे दिसते. अवैध प्रकारचा रेतीसाठा तसेच गिट्टीची चुरी बांधकामासाठी वापरण्यात येत आहे. कामासाठी वापरण्यात आलेला प्लास्टिकचा पाईपही अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप केला जात आहे. साधा खिळासुद्धा त्यामध्ये जातो. यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक