शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनी केली पुढार्‍यांची पोलखोल

By admin | Updated: May 23, 2014 00:17 IST

लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले़ निकालापुर्वी अनेक नेत्यांनी उमेदवाराला खूष करण्यासाठी वेगवेगळ्या वल्गना केल्या़ त्यामध्ये काहिंना यश तर बहुतेकांना अपयशाचा सामना करावा लागला़

गजानन अक्कलवार - कळंब

लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले़ निकालापुर्वी अनेक नेत्यांनी उमेदवाराला खूष करण्यासाठी वेगवेगळ्या वल्गना केल्या़ त्यामध्ये काहिंना यश तर बहुतेकांना अपयशाचा सामना करावा लागला़ गावपुढार्‍यांची मतदारांनी केलेली पोलखोल तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणार्‍या नेत्यांना आपल्याच गावात धोबीपछाड मिळाल्याने त्यांच्या मर्यादाही यानिमीत्ताने स्पष्ट झाल्या आहेत. लोकसभेची निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीने मिळून लढविली. मात्र राष्ट्रवादीचे पदाधिकारी तालुक्यामध्ये निवडणूकीपासून अंतर ठेवून असल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन्ही पक्षात समन्वय राहिला नाही. परिणामी काँगे्रसला मागील निवडणुकीपेक्षाही पिछाडीवर जाण्याची वेळ आली. कळंब शहरामध्ये काँग्रेस पहिल्यांदाच दीड हजारांच्यावर मतांनी माघारली. त्यामुळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच फारूक सिद्धिकी, जिल्हा परिषद सदस्य निलीमा गोहणे, पंचायत समिती सदस्य विजय गेडाम यांच्यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली़ कोठा येथील राष्ट्रवादीचे सुभाष पाटील कदम व काँग्रेसचे शिवशक्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनेश भोरे यांनाही मतदारांनी नाकारले. नेहमी काँग्रेसला हात देणार्‍या डोंगरखर्डाच्या नागरिकांनी यावेळी काँग्रेसला चांगलाच हात दाखविला. येथील काँग्रेसचे माजी पंचायत समितीचे उपसभापती गजानन पंचबुध्दे, बापूसाहेब भिसे यांना मतदानारांनी नाकारले. सावरगाव येथील जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख व पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत देशमुख यांनाही आपले वर्चस्व राखण्याची परंपरा कायम ठेवता आलेली नाही़ त्यामुळे राष्ट्रवादीने कोणाच्या बाजूला काम केले हा विषय संशोधनाचा ठरत आहे. बाजार समितीचे सभापती असलेले काँग्रेसचे महादेव काळे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आनंदराव जगताप यांच्या परसोडी(बु.) या गावात काँगे्रसच्या चारीमुंड्या चित झाल्या. बाजार समितीचे संचालक असलेले आष्टी येथील रमेश दाभेरे यांचाही त्यांच्याच गावात पराभव झाला़ बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक नरेंद्र मानकर यांनाही जोडमोहा या त्यांच्या गावामध्ये सपाटून मार खावा लागला़ रोजगार हमी योजनेचे माजी अध्यक्ष राजेश पोटे यांच्या उमरी या गावात तर काँग्रेस नेस्तनाबूत झाली़ पंचायत समितीचे सभापती प्रल्हाद मांडवकर यांच्या देवनळा गावात मात्र काँग्रेसला आघाडी मिळाली. नांझा येथे पंचायत समिती सदस्य वर्षा वासेकर, आदिवासी महामंडळाचे संचालक अशोक मंगाम यांना काठावर आघाडी मिळविता आली़ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेहंदी कोठडीया यांच्या अंतरगाव या गावातही बोटावर मोजण्या इतपत का हाईना जास्तीचे मते पडली. खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सुदाम पवार यांच्या किन्हाळा या गावात मात्र काँग्रेसला भरभरून मतदान झाले. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बालू पाटील दरणे व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बाबासाहेब दरणे यांची लढत मात्र बरोबरीत सुटली. तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांच्या बुथवर काँग्रेसला थोडी आघाडी घेता आली. एकंदरीत बहुतेक गावात काँग्रेसला सपाटून मार बसला. त्यामुळे येणार्‍या निवडणुका लक्षात घेता काँग्रेस व राष्ट्रवादीवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.