उमरीच्या डोला महाराज वृद्धाश्रमाला दहा पंखे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:03 IST2017-08-24T00:03:28+5:302017-08-24T00:03:49+5:30

आर्णी तालुक्याच्या उमरी पठार येथील डोला महाराज वृद्धाश्रमाला येथील अ‍ॅड. प्रवीण जानी व भारती जानी यांच्यातर्फे दहा सिलिंग फॅन भेट देण्यात आले.

Visitors of the Umari Dola Maharaj came with ten fans | उमरीच्या डोला महाराज वृद्धाश्रमाला दहा पंखे भेट

उमरीच्या डोला महाराज वृद्धाश्रमाला दहा पंखे भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आर्णी तालुक्याच्या उमरी पठार येथील डोला महाराज वृद्धाश्रमाला येथील अ‍ॅड. प्रवीण जानी व भारती जानी यांच्यातर्फे दहा सिलिंग फॅन भेट देण्यात आले. माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते अ‍ॅड. प्रवीण जानी यांच्या निवासस्थानी डोला महाराज वृद्धाश्रमाचे संचालक शेषराव डोंगरे यांना सिलिंग फॅन सुपूर्द करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक प्राणजीवन जानी, माजी आमदार कीर्ती गांधी, प्राचार्य शंकरराव सांगळे, माणिकराव भोयर, विलास देशपांडे, आनंद गावंडे, निसार ममदानी, अमित जानी, मोनिका जानी, अविनाश देशमुख, सुभाष यादव, देवकिसन शर्मा आदी उपस्थित होते. संचालन व आभार हिमानी जानी यांनी मानले.

Web Title: Visitors of the Umari Dola Maharaj came with ten fans