दोघींचा बळी, १२१ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 05:00 AM2020-10-22T05:00:00+5:302020-10-22T05:00:12+5:30

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २४ तासात ६५३ नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये ५३२ जणांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. तर १२१ नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आले आहे. सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह ४९६ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या नऊ हजार ६९२ इतकी झाली आहे. उपचारानंतर प्रकृती सुधारलेल्या ३७ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या आठ हजार ६३६ वर पोहोचली आहे.

Victims of both, 121 new patients | दोघींचा बळी, १२१ नवे रुग्ण

दोघींचा बळी, १२१ नवे रुग्ण

Next
ठळक मुद्देकोरोना कहर : मृतांमध्ये यवतमाळ ६३ वर्षीय तर आर्णीतील ४५ वर्षीय महिलांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सणासुदीच्या काळात कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता यंत्रणेकडून वर्तविली जात आहे. बुधवारी सायंकाळी आलेल्या आकडेवारीवरून ही भीती खरी ठरते की काय असे वाटत आहे. १२१ नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. यवतमाळातील ६३ वर्षीय तर आर्णीतील ४५ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २४ तासात ६५३ नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये ५३२ जणांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. तर १२१ नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आले आहे. सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह ४९६ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या नऊ हजार ६९२ इतकी झाली आहे. उपचारानंतर प्रकृती सुधारलेल्या ३७ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या आठ हजार ६३६ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत ३१४ जणांंचा बळी घेतला आहे. कोरोना चाचणीसाठी ८६ हजार ६१९ नमुने तपासणीला पाठविण्यात आले. यापैकी ८६ हजार ७४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यातील ७६ हजार ३८२ नमुने निगेटीव्ह आले आहेत. प्रयोगशाळेत ५४५ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. तपासणीची गती वाढविण्याचे प्रयत्न होत आहे.

कोरोना संसर्गाचे प्रमाण ११ टक्क्याच्या पुढे
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र ही स्थिती फार काळ टिकणार नाही, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सध्याचा कोरोना संसर्गाचा दर ११ टक्क्याच्या पुढे आहे. तो अजूनही कमी होताना दिसत नाही. मृत्यूदरही तीन टक्क्यापेक्षा अधिक आहे. सण-उत्सव असल्याने शारीरिक अंतर राखले जात नाही. दैनंनिन व्यवहार करताना वैयक्तीक सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा संसर्गाचा धोका वाढत आहे.

Web Title: Victims of both, 121 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.