शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय दवाखाने ‘पांढरा हत्ती’

By admin | Updated: October 6, 2016 00:21 IST

शेती आणि पशूपालन हा मुख्य व्यवसाय असलेल्या महागाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने पांढरा हत्ती ठरले आहेत.

गोपालक त्रस्त : ११२ गावांत एक लाखावर जनावरे, उपचार केवळ नावालाचमहागाव : शेती आणि पशूपालन हा मुख्य व्यवसाय असलेल्या महागाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने पांढरा हत्ती ठरले आहेत. तालुक्यातील अनेक पशुचिकित्सालयांना चक्क कुलूप लागलेले दिसून येते. त्यामुळे उपचारसाठी जनावरे घेऊन आलेले गोपालक त्रस्त झाले आहेत. महागाव तालुक्यात जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाली आहे. दुधाळ जनावरांना पोटफुगीचा त्रास जाणवू लागला आहे. अशा जनावरांना घेऊन पशुचिकित्सालयात गोपालक गेल्यास डॉक्टरच भेट नाही. दिवसभर जनावरांना घेऊन तात्कळत राहावे लागते. महागाव सारख्या तालुका मुख्यालयाचीच ही अवस्था असेल तर इतर पशुचिकित्सालयाची काय अवस्था असेल, असा प्रश्न आहे. अनंतवाडी येथील सोमला राठोड यांच्या शेळीला कुत्र्याने चावा घेतला. उपचारासाठी हा शेतकरी महागाव आणि खडका येथील पशुचिकित्सालयाचे उंबरठे झिजवत आहे. दोन दिवसांपासून डॉक्टर मिळाले नाही. अखेर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली परंतु उपयोग झाला नाही. कलगाव येथील अंकुश भवानकर यांची गाय अज्ञात रोगाने त्रस्त आहे. तिचे पोट फुगले आहे. २०० रुपयांचा दररोज दुधाचा फटका शेतकऱ्याला बसत आहे. पिंपळगाव ई. येथील लक्ष्मण वानखेडे, भाऊसाहेब पाईकराव, भगवान इंगळे, माधव जंगले, योगाजी खोकले यांना बैलजोडीच्या खरेदीसाठी पशुचिकित्सकाचा दाखला पाहिजे. आठ दिवसांपासून हे शेतकरी पशुधन विकास अधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत परंतु उपयोग होत नाही. महागाव तालुक्यात महागाव, फुलसावंगी, गुंज, वनोली, काळी दौ., खडका, मुडाणा, पोखरी, डेंभी, वडद येथे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. ११२ गावातील एक लाख ९ हजार १६५ जनावरांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. परंतु अपवाद वगळता पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयीच राहात नाही. खेड्यातून जनावरे घेऊन आलेला शेतकरी महागावात दिवसभर तात्काळत असतो. विना चारापाण्याची जनावरे परिसरात बांधून असतात. या सर्व प्रकाराकडे जिल्हा पशुधन विकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)जनावरांचे शवविच्छेदन अडकलेनैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर शासकीय मदत मिळते परंतु महागाव तालुक्यातील अनेक मृत जनावरांचे शवविच्छेदन अहवाल अडकले आहे. उटी येथील रामराव पाटील गावंडे यांनी आपल्या मृत म्हशीच्या अहवालासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याला पत्र दिले, परंतु अद्यापही अहवाल दिला नाही. तालुक्यातील अनेक जनावरे पुरात वाहून गेली, मात्र त्यांचे शवविच्छेदन आणि अहवाल अडकले आहे. वारंवार तक्रारी करूनही याबाबची दखल मात्र घेण्यात येत नाही.