वैष्णव विद्यापीठाचा ‘बेस्ट वॉक मेल’ पुरस्कार अभिजित फाळके यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:42 IST2021-04-16T04:42:26+5:302021-04-16T04:42:26+5:30

महागाव : मध्यप्रदेशातील इंदौर येथील वैष्णव विद्यापीठाने फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील मानाचा बेस्ट वॉक मेल पुरस्कार महागावचे सुपुत्र अभिजित फाळके ...

Vaishnav University's 'Best Walk Mail' award to Abhijit Phalke | वैष्णव विद्यापीठाचा ‘बेस्ट वॉक मेल’ पुरस्कार अभिजित फाळके यांना

वैष्णव विद्यापीठाचा ‘बेस्ट वॉक मेल’ पुरस्कार अभिजित फाळके यांना

महागाव : मध्यप्रदेशातील इंदौर येथील वैष्णव विद्यापीठाने फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील मानाचा बेस्ट वॉक मेल पुरस्कार महागावचे सुपुत्र अभिजित फाळके यांना जाहीर केला आहे.

इंदौर येथील वैष्णव विद्यापीठाच्या विश्वविद्यालय टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी विभागाने ऑनलाईन फॅशन शो २०२१ चे आयोजन केले होते. यात देशभरातील फॅशन डिझायनिंग करणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्रातून व जिल्ह्यातून महागावचा सुपुत्र अभिजित भगवान फाळके हा एकमेव विद्यार्थी सहभागी झाला होता. त्याने यात ट्रॅडिशनल अँड वेस्टर्न थीम रॅम्प वॉकमध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून परीक्षकांचे मन जिंकले.

या फॅशन शोमध्ये अभिजितने अव्वल क्रमांक पटकाविला. त्याला बेस्ट वॉक मेल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यातील हिवरा (संगम) येथील भगवान फाळके यांचा अभिजित हा मुलगा आहे. दहावीनंतर अभिजितने फॅशन डिझायनर क्षेत्रात करिअर करायचे, असा ठाम निर्णय घेतला. त्याने पुण्यातील गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमधून फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा केला आहे. सध्या तो सुरतमधील अंकलेश्वर येथील एफडीडीआय कॉलेजमध्ये डिझायनर पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अभिजितने पटकावलेल्या नेत्रदीपक यशाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Vaishnav University's 'Best Walk Mail' award to Abhijit Phalke