शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शहरी उमेदवारांचीच भाऊगर्दी

By admin | Updated: September 29, 2014 23:11 IST

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार हे शहरी भागातील आहेत. ग्रामीणमध्ये त्यांचा संपर्क असला तरी ते मतदान पदरी पाडून घेण्यासाठी

यवतमाळ विधानसभा : ग्रामीण मतदारांवर विजयाचे गणित अवलंबून यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार हे शहरी भागातील आहेत. ग्रामीणमध्ये त्यांचा संपर्क असला तरी ते मतदान पदरी पाडून घेण्यासाठी त्यांना पक्षातील इतरांवर अवलंबून रहावे लागणार आहे. यवतमाळ मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण जिल्हा मुख्यालयाचा हा मतदारसंघ ताब्यात असावा म्हणून सर्वच पक्ष प्रयत्न करतात. याच कारणावरून राहुल ठाकरे यांनी आपला दिग्रस-दारव्हा मतदारसंघ सोडून यवतमाळात धाव घेतली. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया, भाजपाचे माजी आमदार मदन येरावार, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे चिरंजीव राहुल ठाकरे, शिवसेनेचे संतोष ढवळे, बसपाचे शारीक लोखंडवाला आदी प्रमुख उमेदवार आहेत. हे सर्व उमेदवार यवतमाळ शहर व परिसरात राहणारे आहेत. या पैकी कुणाचेही ग्रामीणमध्ये वास्तव्य नाही. बाबासाहेब गाडे पाटील हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यांनी भाजपाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले होते. मात्र ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले. राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करताना त्यांना विधानसभेचा शब्द दिला गेला होता. मात्र तो पाळला गेला नाही. गाडे पाटील यांची अकोलाबाजार, आकपुरी परिसरातील गावांमध्ये भक्कम पकड आहे. मात्र उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यांनी माघार घ्यावी म्हणून भाजपातून दबाव वाढविला जात आहे. त्यात यश येते का, याकडे लक्ष लागले आहे. त्यांनी माघार घेतलीच तर ते नाराज असूनही पक्षासाठी किती प्रामाणिक प्रयत्न करतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल. भाजपाची शहरात तर शिवसेनेची ग्रामीणमध्ये पकड आहे. त्यामुळे शहरातून अधिक मते मिळविण्यावर भाजपाचा भर राहील. काँग्रेस उमेदवाराची ग्रामीणमध्ये तेवढी पकड नाही. यासाठी त्यांना आपल्या पक्षातील पकड असलेल्या एका पदाधिकाऱ्यावर अवलंबून रहावे लागेल. मात्र सदर पदाधिकारी मावळत्या आमदार नंदिनी पारवेकर यांचे निकटवर्तीय आहेत. नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापल्याने त्यांचा व्यक्तीश: प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंवर रोष आहे. आपले तिकीट कापून मुलाला उमेदवारी दिल्याने खरी नाराजी आहे. नंदिनी यांची नाराजी असताना काँग्रेसमधील ते पदाधिकारी खरोखरच राहुल ठाकरेंसाठी किती ताकदीने राबतील, हे महत्वाचे ठरणार आहे. प्रचाराचे नारळ फोडताना या पदाधिकाऱ्याला प्राधान्य देऊन आपलेसे करून घेण्याची धडपड काँग्रेसने चालविली आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील बहुतांश उमेदवार शहरातील रहिवासी असल्याने शहरी मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होणार एवढे निश्चित आहे. ग्रामीण मते विजयश्री निश्चित करू शकतात. ही मते जास्तीत जास्त कुणाला मिळतील यावर त्या उमेदवाराचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. पहिल्यांदाच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे लढत असल्याने आतापर्यंतच्या युती-आघाडीच्या मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे. ते थांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राजकीय पक्षांकडून होणार आहे. मत विभाजन टाळण्यासाठी आपल्या सोईच्या अपक्ष उमेदवारांना बसविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यात कितपत यश येते हे १ आॅक्टोबरला स्पष्ट होईल. (जिल्हा प्रतिनिधी)