शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

कान्हाळगावात अज्ञात रोगाने १५ जनावरे दगावली

By admin | Updated: January 17, 2016 02:30 IST

तालुक्यातील कान्हाळगाव येथील जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाली आहे. या अज्ञात रोगामुळे गेल्या आठ दिवसात या गावातील सुमारे १५ जनावरे दगावली आहेत.

मारेगाव : तालुक्यातील कान्हाळगाव येथील जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाली आहे. या अज्ञात रोगामुळे गेल्या आठ दिवसात या गावातील सुमारे १५ जनावरे दगावली आहेत. लगतच्या वागदरा येथील पशु उपचार केंद्र बेवारस अवस्थेत पडून आहे.तालुक्यातील कान्हाळगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून जनावरांना अज्ञात रोगाने ग्रासले आहे. हे गाव केवळ २५० लोकसंख्येचे आहे. गावात बहुतांश शेतकरी व मजूर आहे. जवळपास प्रत्येकाकडे जनावरे आहे. मुलाबाळांप्रमाणे या जनावरांची काळजी घेतली जाते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून या जनावरांवर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. कान्हाळगाव (वाई) हे गाव वागदरा पशु उपचार केंद्रात समाविष्ठ आहे. या पशु उपचार केंद्रात एक पशुधन पर्यवेक्षक व एक पूर्णवेळ शिपाई कार्यरत असतानाही हे उपचार केंद्र मात्र बेवारस पडून आले. त्यामुळे जनावरांवर उपचार करणे कठीण होऊन बसले आहे. जनावरांना अज्ञात रोगाने ग्रासल्याने पशुपालक प्रचंड हादरले आहे. वागदरा येथील पशू उपचार केंद्र बेवारस असल्याने जनावरांवर उपचार होणेही दुर्लभ झाले आहे. पशु उपचार केंद्रातील एकमेव शिपाई या केंद्रात समाविष्ठ गावांमध्ये केवळ फिरताना दिसत आहे. पशुवैद्यकीय पर्यवेक्षकाचा मात्र या केंद्रात समाविष्ठ गावात किंवा केंद्रात थांगपत्ता लागत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहे.गेल्या आठ दिवसात अज्ञात रोगाने गावातील १५ जनावरांचा बळी घेतला आहे. या जनावरांवर योग्य उपचार होऊ न शकल्याने शेतकरी व पशुपालकांचे लाखमोलाचे पशूधन नष्ट झाले आहे. सध्या खरीप व रबीचा हंगाम सुरू आहे. येत्या काही दिवसात कपाशीच्या उलंगवाडीला सुरूवात होणार आहे. शेतात रबीतील हरभरा व गहू पिक उभे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बैलांची अत्यंत गरज भासते. मात्र ऐन सुगीचा हंगाम सुरू असतानाच अज्ञात रोगाने जनावरांवर आक्रमण केल्याने काही शेतकऱ्यांचे बैलही मृत्यूमुखी पडले आहे. परिणामी या गावातील शेतकरी धास्तावून गेले आहे. पशुपालकही संकटात सापडले आहे. त्यामुळे सर्वच चिंताक्रांत दिसत आहे. या गावातील अज्ञात रोगग्रस्त जनावरांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार करावे, अशी मागणी तेथील रामदास मेश्राम यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)