शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कळंब तहसीलच्या कर्मचाऱ्यांची सहकाऱ्याला अनोखी श्रध्दांजली

By admin | Updated: October 3, 2015 02:19 IST

कामात राम शोधणाऱ्या आणि काम घेऊन येणाऱ्याला देव मानणाऱ्या सहकाऱ्याला येथील तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अनोखी श्रध्दांजली वाहिली.

सुटीच्या दिवशीही पूर्णवेळ काम : लिपिकाचा अपघाती मृत्यूकळंब : कामात राम शोधणाऱ्या आणि काम घेऊन येणाऱ्याला देव मानणाऱ्या सहकाऱ्याला येथील तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अनोखी श्रध्दांजली वाहिली. एरवी कार्यालयात उशिरा पोहोचणारे आणि सुटीचा दिवस आनंदात घालविणारे कर्मचारी शुक्रवारी सुटी असूनही पूर्णवेळ कार्यालयात हजर राहून काम करीत होते. या कार्यालयातील कनिष्ठ लिपीक शालिग्राम कांडेलकर यांचा बुधवारी अपघाती मृत्यू झाला. त्यांना ही अनोखी श्रध्दांजली होती.गुरुवारी आपले सहकारी शालिग्राम कांडेलकर यांचे निधन झाल्याची वार्ता सर्व कर्मचाऱ्यांना कळली. आपल्यातील एक सहकारी निघून गेल्याचे दु:ख प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होते. केवळ श्रध्दांजली अर्पण करून सोपस्कर पूर्ण करण्याऐवजी एक दिवस काम करून अनोखी श्रध्दाजंली वाहण्याचा निर्णय तहसीलदार संतोष काकडे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांजवळ बोलून दाखविला. त्यानुसार शुक्रवार सुटीच्या दिवशी शासकीय कामकाम करताना कर्मचारी दिसून आहे. कांडेलकर हे अतिशय प्रामाणिक कर्मचारी होते. कुठलेही काम जेव्हाच्या तेव्हा पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असायचा. मन लावून काम करण्याची त्यांची हातोटी होती. त्यांनी यापूर्वी सैन्यात काम केले होते. त्यांच्या कामात कमालीची शिस्त पाहायला मिळायची. अशा कर्तव्यतत्पर माणसाला सुटीच्या दिवशीही दिवसभर काम करून श्रध्दाजंली अपर्ण करण्याचे ठरविले. यासाठी सर्वांनी सहकार्य केले, असे तहसीलदार संतोष काकडे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)