फुलसावंगीत आढळला बेवारस मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST2021-06-19T04:27:33+5:302021-06-19T04:27:33+5:30

भावराव नागू पवार (वय ५०, रा. कुरळी (घमापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी काही नागरिकांना मंदिराच्या पायथ्याशी ...

Unclaimed bodies found in Phulsawangi | फुलसावंगीत आढळला बेवारस मृतदेह

फुलसावंगीत आढळला बेवारस मृतदेह

भावराव नागू पवार (वय ५०, रा. कुरळी (घमापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी काही नागरिकांना मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या निर्जळस्थळी मृतदेह आढळला. ही वार्ता गावात पसरली. याबाबत पोलीसपाटील राजेश नाईक यांनी महागाव पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार विलास चव्हाण यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

मृतदेहाजवळ उंदीर मारण्याचे औषध आढळले. मात्र, हा घातपात की आत्महत्या, याचा शोध घेण्याचे आव्हान महागााव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. बीट जमादार नीलेश पेंढारकर, शिपाई बालाजी मारकड पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, गुरुवारीच भावराव पवार हे बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी दराटी पोलीस ठाण्यात दिली होती.

Web Title: Unclaimed bodies found in Phulsawangi